शिवजयंतीदिवशी अभिनेता रितेश देशमुखची सर्वांत मोठी घोषणा!

On: February 19, 2024 5:38 PM
Riteish Deshmukh new movie Raja Shivaji
---Advertisement---

Riteish Deshmukh | राज्यभर आज (19 फेब्रुवारी) शिवजयंती मोठ्या जल्लोषात साजरी केली जात आहे. शिवजयंतीनिमित्ताने राज्यभर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आज शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवरच अभिनेता रितेश देशमुखने (Riteish Deshmukh) सर्वांत मोठी घोषणा केली आहे.

2022 मध्ये ‘वेड’ या मराठी चित्रपटातून रितेशने दिग्दर्शन पाऊल ठेवलं. यामध्ये त्याची पत्नी जिनिलिया देशमुख मुख्य भुमिकेत होती. आता ‘वेड’च्या यशानंतर रितेश पुन्हा एकदा दिग्दर्शक म्हणून एका चित्रपटासाठी काम करणार आहे. याबाबत त्याने स्वतः घोषणा केली आहे.

रितेश देशमुखने केली मोठी घोषणा

रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. ‘राजा शिवाजी’ असं या चित्रपटाचं नाव असणार आहे. “इतिहासाच्या गर्भात, एक अशी आकृती जन्माला आली जीचं अस्तित्व नश्वरतेच्याही पल्याड होतं. एक प्रतिमा, एक आख्यायिका, जे धगधगत्या प्रेरणेचं चिरंतन अग्नीकुंड होतं. छत्रपती शिवाजी महाराज..फक्त इतिहासपुरुष नाहीत. ती एक भावना आहे, असामान्य शौर्याचा पोवाडा आहे, साडे तिनशे वर्षांपासून. प्रत्येकाच्या मनामनात उगवणारा आशेचा एक महासूर्य आहे.”, अशी पोस्ट रितेशने (Riteish Deshmukh) केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

शिवरायांची महागाथा भव्य पडद्यावर जिवंत करता यावी अशी आमची दुर्दम्य महत्वाकांक्षा होती. एका प्रतापी पुत्राच्या महागाथेचा प्रवास ज्याने एका महाकाय सत्तेला उलथवत आणि स्वराज्याचा धगधगता वणवा पेटवला. एक रणधुरंधर, जिथे शौर्याला सिमा नाही. ज्यांनी जमिनींवर नाही रयतेच्या मनामनांवर राज्य केलं …आणि म्हणूनच प्रत्येकाच्या मुखी ज्यांचं नाव आहे….’राजा शिवाजी’ असे रितेशने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

‘राजा शिवाजी’ कधी प्रदर्शित होणार?

या चित्रपटाचे निर्मिते ज्योति देशपांडे आणि त्याची पत्नी जिनीलिया देशमुख आहे. तर यात अजय-अतुल यांचे संगीत असणार आहे. हा चित्रपट मराठी आणि हिंदीमध्ये प्रदर्शित होणार आहे. 2025 मध्ये तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

रितेश देशमुखच्या (Riteish Deshmukh) या पोस्टवर आता अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवजयंतीच्या मुहूर्ताला त्याने ही घोषणा केली आहे. यामुळे चाहत्यांना बराच आनंद झाला आहे.सर्वच जणांना आता या चित्रपटाची प्रतिक्षा लागली आहे.

News Title-  Riteish Deshmukh new movie Raja Shivaji

महत्त्वाच्या बातम्या –

आयपीएल सुरू होण्याआधीच CSK ला मोठा धक्का, ‘हा’ खेळाडू गंभीर जखमी

अभिनेता वरुण धवनने चाहत्यांना दिली मोठी गुड न्यूज!

‘या’ विद्यार्थींनींना मिळणार मोफत शिक्षण, अजित पवारांनी केली मोठी घोषणा

शिवजयंतीनिमित्त पुण्याच्या वाहतुकीत मोठे बदल, आत्ताच जाणून घ्या…

टाटा समूहाला ‘देव’ पावणार? वैष्णोदेवी ते अयोध्येपर्यंत कमाईची ‘भारी’ योजना

Join WhatsApp Group

Join Now