रिषभ हे वागणं बरं नव्हं…! राजस्थानविरूद्ध स्वस्तात बाद होताच पारा चढला, Video

On: March 29, 2024 11:47 AM
Rishabh Pant
---Advertisement---

Rishabh Pant | राजस्थान रॉयल्सने गुरुवारी दिल्ली कॅपिटल्सचा (RR vs DC) पराभव करून आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील परंपरा कायम ठेवली. खरं तर सलग 9 सामन्यांमध्ये यजमान संघाने विजय मिळवला. जयपूर येथे झालेल्या या सामन्यात राजस्थानने दिल्लीचा 12 धावांनी पराभव केला. अखेरचे षटक घेऊन आलेल्या आवेश खानने कमाल करत सामना आपल्या संघाच्या नावावर केला. त्याने शेवटच्या षटकात केवळ 4 धावा दिल्याने राजस्थानने शानदार विजय मिळवला. (IPL 2024 News)

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना यजमान राजस्थान रॉयल्सच्या संघाने निर्धारित 20 षटकांत 5 बाद 185 धावा केल्या. रियान पराग वगळता राजस्थानच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. रियानने 6 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने 45 चेंडूत 84 धावांची नाबाद खेळी केली.

दिल्लीचा सलग दुसरा पराभव

राजस्थानने दिलेल्या 186 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीकडून सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने चांगली सुरुवात केली. त्याने 3 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने 34 चेंडूत 49 धावा कुटल्या. त्याच्या अप्रतिम खेळीच्या जोरावर दिल्लीने विजयाच्या दिशेने कूच केली पण यजमानांनी पुनरागमन करत सामना आपल्या नावावर केला.

दिल्लीकडून अखेरच्या काही षटकांमध्ये ट्रिस्टन स्टब्सने स्फोटक खेळी केली. त्याने 44 धावा करून संघर्ष केला पण दिल्लीला विजयापासून दूरच राहावे लागले. स्टब्सने 3 षटकार आणि 2 चौकार लगावले. अखेर दिल्लीचा संघ निर्धारित 20 षटकांत 5 बाद केवळ 173 धावा करू शकला आणि सामना 12 धावांनी गमावला.

 

Rishabh Pant चा संताप

दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंत छोटी खेळी करून बाद झाला. त्याला 26 चेंडूत 28 धावा करता आल्या. पंत बाद होताच त्याचा पारा चढला. बाद झाल्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये जात असतानाचा रिषभचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याचा संताप स्पष्टपणे दिसतो.

दरम्यान, दिल्लीला सलग दुसऱ्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. पहिल्या सामन्यात पंजाब किंग्जकडून रिषभ पंतच्या संघाचा पराभव झाला होता. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सने सलग दुसरा सामना जिंकला. त्यांनी आपल्या सलामीच्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचा 20 धावांनी पराभव केला होता.

News Title- A video of Rishabh Pant getting angry after getting dismissed against Rajasthan Royals is going viral
महत्त्वाच्या बातम्या –

आता घरबसल्या करा FASTag रिचार्ज तेही अगदी काही मिनिटांतच; या स्टेप्स फॉलो करा

ऐश्वर्या सोडणार ‘बच्चन’ कुटुंबियांचं घर?; अखेर कारण आलं समोर

हार्दिक पांड्यामुळे मुंबई इंडियन्सवर लज्जास्पद विक्रमाची नोंद

हार्दिक पांड्याला संघातून काढणार?, ‘या’ तडाखेबाज खेळाडूमुळे हार्दिकचं करिअर सापडलंय संकटात

चित्रपट चालत नसल्याने राजकारणात एंट्री?; कंगनानं अखेर सांगितलं कारण

Join WhatsApp Group

Join Now