Rinku Singh | भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू अन् फिनिशर म्हणून प्रसिद्धी मिळवणारा रिंकू सिंग नेहमी चर्चेत असतो. अलीकडेच पार पडलेल्या अफगाणिस्तानविरूद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेत त्याने चमक दाखवली. मालिकेतील अखेरच्या सामन्यात रिंकूने भारतीय कर्णधार रोहित शर्मासोबत मोठी खेळी केली. संघ अडचणीत असताना वेळोवेळी धावून येणाऱ्या रिंकूने आपल्या खेळीने चाहत्यांना भुरळ घातली आहे.
खरं तर प्रसिद्धीच्या शिखरावर आपला लेक असताना देखील रिंकूचे वडील गॅस सिलिंडरची वाहतूक करताना दिसले. 26 वर्षीय युवा भारतीय फलंदाज रिंकू सिंग आपल्या उत्कृष्ट कामगिरीने क्रिकेट विश्वात खळबळ माजवत आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना रिंकूने एकात षटकात पाच षटकार ठोकून आपली क्षमता दाखवून दिली. आयपीएलमधील शानदार कामगिरीनंतर रिंकूला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली.
लेक प्रसिद्धीच्या शिखरावर अन्…
मागील वर्षी आयपीएलमध्ये रिंकूने एकट्याने कोलकाता नाईट रायडर्सला गुजरात टायटन्सविरुद्ध सलग पाच षटकारांसह विजय मिळवून दिला होता. त्या स्फोटक खेळीने त्याला रातोरात प्रसिद्धी मिळवून दिली. मात्र, डावखुऱ्या फलंदाजासाठी यशाचा मार्ग सोपा नव्हता. रिंकूने युवा यश दयालच्या एकाच षटकात पाच षटकार ठोकण्याची किमया साधली होती.
दरम्यान, रिंकूचे वडील खानचंद्र सिंह हे उत्तर प्रदेशातील अलीगढ येथील एका सामान्य कुटुंबातील आहेत. ते एलपीजी सिलिंडरचे वितरण करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत. विशेष बाब म्हणजे आजही ते हे काम करत आहेत. आपल्या मुलाने क्रिकेटच्या जगात चांगली प्रगती करूनही खानचंद्र अजूनही नम्रता आणि समर्पण दाखवत सिलिंडर वितरणाच्या कामात गुंतलेले आहेत.
Rinku Singh च्या वडिलांचा भावनिक video
रिंकूच्या वडिलांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. चाहत्यांसह अनेकांनी रिंकूच्या वडिलांच्या कष्टाला दाद दिली. तसेच त्यांचा नम्रपणा अनेकांना भुरळ घालणारा आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये रिंकूचे वडील सिलिंडर गॅसची वाहतूक करताना दिसत आहेत. अनेकजण खानचंद्र सिंह यांच्या मुलाच्या यशाने त्यांची नम्र जीवनशैली बदलू न दिल्याबद्दल आणि त्यांच्या समाजात अभिमानाची भावना निर्माण केल्याबद्दल त्यांचे कौतुक करत आहेत.
Cricketer Rinku Singh’s father is still doing the same job. Such a down to earth person ????????????????????#Rinku_Singh#RinkuSingh#INDvENG #RepublicDay #cricketlovers #Bihar #Biharpoltics @rinkusinghsrk pic.twitter.com/Yl8seymkMa
— Akarsh Singh (@Akarsh_sing) January 26, 2024
रिंकू सिंगने 15 ट्वेंटी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे, ज्यामध्ये त्याने 176.24 च्या स्ट्राईक रेटने 356 धावा केल्या आहेत. स्फोटक खेळीच्या जोरावर त्याला दोन अर्धशतके झळकावता आली आहे, ज्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 69 ही आहे. त्याने 50 षटकांच्या फॉरमॅटमध्ये दोन वन डे सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याला एकूण 55 धावा करता आल्या आहेत.
News Title- A video of Indian cricket team player Rinku Singh’s father transporting gas cylinders is going viral
महत्त्वाच्या बातम्या –
14 वर्षापूर्वी मित्राचं ऐकलं असतं तर आज पश्चात्ताप झाला नसता; Sania Mirza चं मोठं विधान
“सरकार पाडण्यासाठी ‘आप’च्या आमदारांना 25 कोटींची ऑफर”, Arvind Kejriwal यांचा गौप्यस्फोट
सेल्फी घेताना तरूणीचा Bobby Deol ला KISS, अभिनेताही अवाक्, video viral
Rohan Bopanna 43 व्या वर्षी ग्रँड स्लॅम विजेता! वयाचा दाखला देत आव्हाडांची विरोधकांवर टीका
Nitish Kumar | “एकवेळ मरण पत्करु, पण भाजपसोबत जाणार नाही”; नितीश कुमारांचा जुना व्हिडीओ व्हायरल






