“तो सारखा घरी यायचा, एकदा तर…”, रिंकू राजगुरुने सांगितला धक्कादायक किस्सा

On: March 10, 2024 6:07 PM
Rinku Rajguru shocking revelation
---Advertisement---

Rinku Rajguru | ‘सैराट’ फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू प्रसिद्धीच्या बाबतीत भल्याभल्यांना आता मागे टाकते. ‘सैराट’ हा तिचा (Rinku Rajguru) पहिला चित्रपट ठरला. याच चित्रपटाने तिला प्रसिद्धी मिळवून दिली. आज तिच्या अदांनी ती चाहत्यांना घायाळ करत असते.

रिंकू नेहमी आपले फोटो सोशल मिडियावर पोस्ट करत असते. तिचे साडीमधील तर अनेक फोटो आहेत. सोशल मिडियावर सतत सक्रिय राहून ती चाहत्यांशी कनेक्ट असते. नुकतंच एका कार्यक्रमामध्ये तिने धक्कादायक खुलासा केला आहे. एका चाहत्याबाबतचा अनुभव रिंकूने शेअर केला.

‘सैराट’ सिनेमावेळी रिंकूचा चाहतावर्ग प्रचंड मोठा होता. तिला पाहण्यासाठी चाहते प्रत्येक ठिकाणी गर्दी करायचे. जिथे रिंकू जायची तिथे चाहते गर्दी करायचे. अशाच एका चाहत्याबद्दल तिने एक खुलासा केला आहे. ज्याचा रिंकूला बराच त्रास झाला होता.

रिंकू राजगुरूचा धक्कादायक खुलासा

रिंकू झी मराठीवरील ‘बस बाई बस’ या कार्यक्रमात आली होती. इथे तिने सैराटनंतरचा एक अनुभव शेअर केला. एका कार्यक्रमासाठी मी गेले होते. तेव्हा नॉर्मल जसं आपण एखाद्याकडे बघून स्माईल करतो. तसं मी एका व्यक्तीला बघून स्माईल दिली, असं रिंकूने (Rinku Rajguru) सांगितलं.

पुढे ती म्हणाली की, त्या कार्यक्रमामध्ये प्रचंड गर्दी होती. या गर्दीत मी चाहत्यांना ‘हाय’ केलं. त्यातीलच एक व्यक्ती कोण होता हे देखील मला माहिती नाही. एके दिवशी तो आमच्या घरी आला. सु्ट्टीचा दिवस असल्याने आई-बाबा घरी होते. घरी लोक भेटायला येतात, तसंच कुणी आलं असेल, असं बाबांना वाटलं.

“मला तुझ्याशी लग्न करायचंय..”

मात्र पुढे तो व्यक्ती जे बोलला त्याने मला धक्काच बसला. तो थेट म्हणाला की, मला तुमच्या मुलीशी लग्न करायचं आहे. तिने माझ्या डोळ्यात बघितलंय. ती रुक्मिणीचा अवतार आहे आणि मागच्या जन्मी मी देवच होतो. त्यामुळे या जन्मात माझं तिच्याशी लग्न व्हायला पाहिजे. हे ऐकून आई-बाबा आम्ही सगळेच थक्क झालो, असा अनुभव यावेळी रिंकूने (Rinku Rajguru) सर्वांना सांगितला.

News Title- Rinku Rajguru shocking revelation

महत्त्वाच्या बातम्या –

धक्कादायक! देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमात वृद्ध महिलेचा मृत्यू

अश्विनची रेकॉर्डब्रेक कामगिरी, जे कोणी करून दाखवलं नाही ते केलं

जय शहा यांची मोठी घोषणा, कसोटी खेळणाऱ्या खेळाडूंवर पैशांचा पाऊस

‘पैशांसाठी राज कुंद्रासोबत लग्न केलं?’, शिल्पा शेट्टीचं ट्रोलर्सला चोख प्रत्युत्तर

बारामतीत नणंद भाऊजय यांची गळाभेट, व्हिडीओ व्हायरल

Join WhatsApp Group

Join Now