भर कार्यक्रमात रिंकू राजगुरूसोबत चाहत्यांनी केलं असं काही की, व्हिडीओ व्हायरल

On: March 4, 2024 2:27 PM
Rinku Rajguru
---Advertisement---

Rinku Rajguru | ‘सैराट’ फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू प्रसिद्धीच्या बाबतीत भल्याभल्यांना आता मागे टाकते. ‘सैराट’ हा तिचा (Rinku Rajguru) पहिला चित्रपट ठरला. याच चित्रपटाने तिला प्रसिद्धी मिळवून दिली. आज तिच्या एका अदाने ती चाहत्यांना घायाळ करत असते. मात्र, नुकताच तिच्यासोबत एक धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे.

एका कार्यक्रमात रिंकू राजगुरू सोबत चाहत्यांकडून गैरवर्तन करण्यात आलं. यामुळे ती चांगलीच भडकली. तिचा या कार्यक्रमातील व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ बघून सोशल मिडियावरही संताप व्यक्त केला जात आहे.

नेमकं काय घडलं?

नुकतंच जळगावमध्ये महासांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या महोत्सवाला विशेष पाहुणी म्हणून अभिनेत्री रिंकू राजगुरू उपस्थित होती.तिला पाहण्यासाठी चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती.कार्यक्रम संपल्यानंतर रिंकू जेव्हा बाहेर जात होती, तेव्हा काही चाहत्यांनी धक्काबुक्की केली.

याच गर्दीतून बाहेर पडताना रिंकूलाही एका चाहत्याचा धक्का लागला. त्यामुळे रिंकू चांगलीच भडकताना दिसून आली. ‘या जागी तुमची मुलगी असती तर चाललं असतं का’, असा थेट प्रश्नच यावेळी रिंकूने (Rinku Rajguru) त्या चाहत्याला केला. याचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.

या सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन शासनाकडून करण्यात आलं होतं. मात्र कार्यक्रम संपल्यानंतर गर्दीवर नियंत्रण मिळवण्यास आयोजकांना अपयश आल्याचं यातून दिसून आलं. याचा सामना अभिनेत्रीला करावा लागला. यावेळी रिंकूने ‘सैराट’मधील तिचा लोकप्रिय डायलॉगसुद्धा बोलून दाखवला.

‘सैराट’ने दिली रिंकू राजगुरूला प्रसिद्धी

नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ या चित्रपटाने अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) आणि आकाश ठोसर यांना प्रसिद्धी मिळवून दिली. ‘सैराट’च्या शूटिंगच्या वेळी ती फक्त 15 वर्षांची होती. हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि दोघेही रातोरात प्रसिद्ध झाले.आज रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर अनेक चित्रपटांचा भाग आहेत. त्यांचा चाहतावर्ग आता मोठा झाला आहे. नुकतीच अभिनेत्री ‘झिम्मा 2’ या चित्रपटात दिसून आली.

News Title- Rinku Rajguru Lashed Out At Fans For Misbehaviour In Jalgaon

महत्त्वाच्या बातम्या –

“अभिनेत्याच्या मुलाचं कौतुक होत होतं पण…”, सुशांतच्या बहिणीचा मोठा खुलासा

IPL ला 20 दिवस बाकी अन् धोनीच्या CSK ला मोठा धक्का; स्टार खेळाडू स्पर्धेबाहेर

मोठी बातमी | IPL 2024 च्या तोंडावर अशुभ घटना, गुजरातच्या ‘या’ स्टार खेळाडूचा मोठा अपघात

प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्याने मोठा गोंधळ, महाविकास आघाडीत झाली बिघाडी?

“यांनी पार माझी पोरं सोडली नाहीत…,” भर सभेत सुप्रिया सुळे यांनी सांगितलं असं काही…

Join WhatsApp Group

Join Now