गृहकर्जदारांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता, RBI महत्त्वाचा निर्णय घेणार

On: June 5, 2025 12:55 PM
RBI Repo Rate Cut
---Advertisement---

Repo Rate Cut | भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण विषयक समितीची बैठक सध्या सुरू असून, ६ जून रोजी पतधोरण जाहीर केले जाईल. या बैठकीत रेपो रेट किती घटवला जाईल, याची घोषणा होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे गृहकर्जदारांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक असलेल्या भारतीय स्टेट बँक च्या रिसर्च रिपोर्टमध्ये रिझर्व्ह बँक यावेळी ०.५० टक्क्यांनी, म्हणजेच ५० बेसिस पॉईंट्सने रेपो रेट कमी करू शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कर्जाच्या चक्राला गती देण्यासाठी आणि सध्याच्या आर्थिक अनिश्चिततांचा परिणाम कमी करण्यासाठी असा निर्णय घेतला जाऊ शकतो, असे संकेत मिळत आहेत.

रेपो रेटमध्ये दोनवेळा कपात:

रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण (Repo Rate Cut) विषयक समितीची बैठक ४ जून ते ६ जून दरम्यान सुरू राहील. या बैठकीत जे महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातील, त्याची घोषणा ६ जून .रोजी सकाळी ११ वाजता करण्यात येईल. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या रिपोर्टमध्ये पतधोरण विषयक समितीच्या बैठकीत रेपो रेट ०.५० टक्क्यांनी घटवण्यात येईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हा अंदाज इतर अर्थतज्ज्ञांच्या अंदाजापेक्षा अधिक आहे, कारण गेल्या काही दिवसांत अर्थतज्ज्ञांनी देशातील महागाई दर ४ टक्क्यांपेक्षा कमी असल्याने २५ बेसिस पॉईंट्सची कपात होऊ शकते, असे म्हटले होते

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास (Shashikant Das) यांच्या कार्यकाळात रेपो रेट स्थिर ठेवण्यात आला होता. मात्र, सध्याचे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय म्हलोत्रा यांनी पदभार स्वीकारल्यानंतर दोनवेळा रेपो रेट घटवला आहे. फेब्रुवारी आणि एप्रिलमध्ये दोन्ही वेळा प्रत्येकी ०.२५ टक्क्यांनी रेपो रेट घटवण्यात आला आहे. सध्या रेपो रेट ६ टक्क्यांवर आहे. आता रिझर्व्ह बँक तिसऱ्यांदा दिलासा देणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Repo Rate Cut |रेपो रेट म्हणजे काय आणि त्याचा परिणाम काय? :

रेपो रेट (Repo Rate) म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया देशातील बँकांना ज्या दराने कर्ज देते तो दर होय. त्यानंतर बँका रेपो रेटच्या आधारे खातेदारांना कर्ज पुरवठा करतात. रेपो रेटपेक्षा कर्जाचा व्याज दर अधिक असतो. जर रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये कपात करण्याचा निर्णय जाहीर केला, तर बँका देखील त्यांच्या कर्जांचे व्याज दर घटवतात. त्यामुळे, ज्यांनी ‘फ्लोटिंग व्याजदर’ (Floating interest rate) पर्याय निवडून कर्ज घेतले असेल, त्यांच्या कर्जाचे ईएमआय (EMI) कमी होतील. रेपो रेट ०.५० टक्क्यांनी घटल्यास, गृह खरेदीसाठीच्या कर्जाचे व्याज कमी होईल. (Repo Rate Cut)

याशिवाय, वाहन कर्जाच्या व्याजात देखील कपात होऊ शकते, ज्यामुळे ग्राहकांना मोठा आर्थिक फायदा मिळेल. रेपो रेट संदर्भातील अधिकृत घोषणा आता ६ जून रोजी सकाळी ११ वाजता होईल.

News Title: Repo Rate: Good News for Home Loan Borrowers, Will RBI Reduce Repo Rate by 0.50%? Estimate from Country’s Largest Public Bank

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now