Instagram Update | आता डायरेक्ट डाऊनलोड करता येणार Reels, पाहा कसे

On: November 24, 2023 3:12 PM
---Advertisement---

मुंबई | इंस्टाग्राम हे भारतातील नवीन टिकटॉक बनलं आहे. 2020 मध्ये TikTok वर बंदी आल्यानंतर, Instagram ने Reels चा ऑप्शन आणला. इन्स्टाग्राम रील्सच्या प्रचंड यशानंतर मेटाने फेसबुकवर रिल्स फीचर देखील जारी केलं. रील भारतात खूप लोकप्रिय आहेत.

इंस्टाग्राम रील्स डाऊनलोड करताना यूजर्सना खूप त्रास होत होता. आता कंपनीने ही समस्या सोडवली आहे. इंस्टाग्राम रील्स आता कोणत्याही थर्ड पार्टी अॅपशिवाय डाउनलोड करता येणार आहेत. याआधी हे फीचर अमेरिकेत लाइव्ह करण्यात आले होते पण आता ते भारतीय यूजर्ससाठीही लाँच करण्यात आले आहे.

इन्स्टाग्रामचे प्रमुख अॅडम मोसेरी यांनी ही माहिती दिली आहे. हे वैशिष्ट्य येण्यापूर्वी, रील डाउनलोड करण्यासाठी थर्ड पार्टी रिल्स सेव्हर अॅप आवश्यक होते.

रील्स इन्स्टाग्राम अॅपवरूनच डाउनलोड केले जातील 

इंस्टाग्राम रील्स डाऊनलोड करताना यूजर्सना खूप त्रास होत होता. आता कंपनीने ही समस्या सोडवली आहे. इंस्टाग्राम रील्स आता कोणत्याही थर्ड पार्टी अॅपशिवाय डाउनलोड करता येणार आहेत.

याआधी हे फीचर अमेरिकेत लाइव्ह करण्यात आलं होतं पण आता ते भारतीय यूजर्ससाठीही लाँच करण्यात आले आहे. इन्स्टाग्रामचे प्रमुख अॅडम मोसेरी यांनी ही माहिती दिली आहे. हे वैशिष्ट्य येण्यापूर्वी, रील डाउनलोड करण्यासाठी थर्ड पार्टी रिल्स सेव्हर अॅप आवश्यक होते.

थर्ड पार्टी अॅपशिवाय इंस्टाग्राम रील कसे डाउनलोड करावं-

इन्स्टाग्रामचे ते सर्व रील जे सार्वजनिक आहेत ते अॅपवरूनच डाउनलोड केले जाऊ शकतात. यासाठी तुम्हाला डाउनलोड करायचे असलेले रील निवडा. आता शेअर बटणावर क्लिक करा. यानंतर तुम्हाला खाली अनेक पर्याय दिसतील. त्यापैकी डाउनलोड चिन्हावर क्लिक करा. यानंतर रील डाउनलोड करा.

महत्त्वाच्या बातम्या- 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now