मोबाईलचे व्यसन सोडवण्यासाठी ‘या’ खास टिप्स फॉलो करा!

On: January 20, 2025 12:12 PM
Smartphone
---Advertisement---

Smartphone l स्मार्टफोन (Smartphone) हा आजकाल आपल्या जीवनाचा (Life) एक अविभाज्य भाग (Integral Part) बनला आहे. फोनचा वापर केवळ कॉलिंगपुरता (Calling) मर्यादित न राहता, सोशल मीडियाद्वारे (Social Media) लोकांशी जोडले राहणे, मनोरंजन (Entertainment), ऑनलाइन पेमेंट (Online Payment) अशा अनेक कारणांसाठी केला जातो. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण स्मार्टफोन वापरत असतो. त्यामुळे आपला स्क्रीन टाइम (Screen Time) खूप जास्त होतो, ज्याचा आपल्या आरोग्यावर (Health) विपरीत परिणाम (Negative Impact) होत असतो.

स्मार्टफोनचा अतिवापर (Excessive Use) हानिकारक :

अनेक संशोधनांद्वारे (Research) हे सिद्ध झाले आहे की, स्मार्टफोनचा जास्त वापर आपल्यासाठी हानीकारक ठरू शकतो. यामुळे आरोग्याच्या समस्या (Health Problems) उद्भवू शकतात. अनेकांना स्मार्टफोनचे व्यसन कमी करायचे असते, परंतु कितीही प्रयत्न केले तरी ते फोनपासून दूर राहू शकत नाहीत. जर तुम्ही स्मार्टफोनवर जास्त वेळ घालवत असाल तर तुम्हाला काही सवयी लावणे गरजेचे आहे.

स्मार्टफोन व्यसनापासून बाहेर पडण्यासाठी काही खास टिप्स :

– सर्वात प्रथम स्वत:वर संयम ठेवायला शिका. स्मार्टफोन किंवा इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंपासून स्वत:ला थोडे दूर ठेवण्याचा प्रयत्न करा

– तुम्ही तुमचा जास्तीत जास्त वेळ कुटुंबासोबत किंवा मित्र-मैत्रिणींसोबत घालवा. यामुळे तुम्ही काही काळ मोबाईलपासून दूर राहाल.

– गरज पडल्यास फोनचा वापर करा. अन्यथा फोनचा वापर शक्य तितका टाळा.

– दिवसभर ऑनलाईन राहण्यापेक्षा कामापुरती गरज असतानाच ऑनलाईन रहा.

– स्वत:ला रिलॅक्स ठेवण्यासाठी काही काळ वॉकला जा किंवा तुम्ही ज्या गोष्टीत रमता ती गोष्ट करा.

News Title : Reduce your smartphone addiction with this simple setting

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now