मुंबई | सरकारी नोकरी (Job) हे अनेकाचं ध्येय असतं. तुम्ही देखील एखाद्या चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. बँकींग क्षेत्रात काम करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांंसाठी मोठी संधी आली आहे.
फेब्रुवारी महिन्यात सेंट्रल बँक ऑफ इंडियाने (Central Bank of India) अधिसूचना जारी केली आहे. यासंदर्भात सरकारी पोर्टलवर सूचना देण्यात आली आहे.अधिसूचनेत दिल्याप्रमाणे 11 फेब्रुवारीपर्यंत दोन पदासाठी तुम्ही ऑनलाइन अर्ज करु शकता. centralbankofindia.co.in या वेबसाईटवर ऑनलाइन अर्ज उपलब्ध आहेत.
सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये वरिष्ठ व्यवस्थापन ग्रेड 4 मधील मुख्य व्यवस्थापकाच्या (Chief Manager) 50 पदांसाठी जागा उपलब्ध आहेत. मध्यम व्यवस्थापन श्रेणी 3 मधील वरिष्ठ व्यवस्थापकाच्या (Senior Manager) 200 पदांसह एकूण 250 पदांसाठी भरतीसाठी अर्ज मागवत आहे. आवेदनसाठी अर्ज करताना तुम्हाला 850 इतका शुल्क भरावा लागेल.
उमेदवाराने मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीचे शिक्षण पूर्ण केलेलं असावं. मुख्य व्यवस्थापक पदांसाठी संबंधित क्षेत्रातील किमान 7 वर्षाचा अनुभव(Experience) आणि वरिष्ठ व्यवस्थापक पदांसाठी किमान 5 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. मुख्य व्यवस्थापक पदांसाठी उमेदवाराचे वय 40 वर्षापेक्षा जास्त तर वरिष्ठ व्यवस्थापक पदासाठी उमेदवाराचं वय 35 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
महत्त्वाच्या बातम्या






