Realme च्या ‘या’ 5G फोनवर तब्बल इतक्या हजारांचा मिळणार डिस्काउंट; जाणून घ्या ऑफर्स

On: April 13, 2024 2:46 PM
Realme P1 5G Sale Offer
---Advertisement---

Realme P1 5G Sale Offer | सध्या 5G फोन वापरकर्ते अधिक आहेत. प्रत्येकालाच आपल्याकडे स्मार्टफोन असावा, अशी इच्छा असते. पण, स्मार्टफोन घ्यायचा म्हटल्यावर खिसाही जास्त रिकामा करावा लागतो. पण, तुमच्यासाठी Realme कंपनीने खास ऑफर आणली आहे.

Realme च्या नव्या 5G फोनवर सर्वांत मोठी ऑफर ठेवण्यात आली आहे. यावर तुम्हाला तब्बल 2 हजारांचे कूपन डिस्काउंटमध्ये मिळणार आहे. या सेलची सुरुवात 15 एप्रिलला होणार आहे. पण, याचा लाभ तुम्ही फक्त 2 तासांच्या आत घेऊ शकता.

Realme P1 5G या फोनसाठी कंपनीने सेल 15 एप्रिलरोजी सायंकाळी 6 ते 8 दरम्यान ठेवला आहे. या फोनला तुम्ही Flipkart आणि Realme.com या दोन्ही फ्लॅटफॉर्मवर खरेदी करू शकता. अर्ली बर्ड सेल ऑफरच्या अंतर्गत तुम्हाला 2000 रुपयांचे कूपन डिस्काउंटमध्ये मिळेल.

या डिस्काउंट कूपनचा वापर तुम्ही Realme P1 5G च्या सर्व वेरिएंट्सवर करू शकाल. त्यामुळे हा फोन खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे फक्त 2 तास असतील. याच्या आतच ही ऑफर वैध ठरवण्यात आली आहे.

Realme P1 5G स्पेसिफिकेशन्स

या फोनमध्ये 6.67-inch चा FHD+ AMOLED डिस्प्ले मिळेल.जो 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट करेल. स्क्रीनची पीक ब्राइटनेस 2000 Nits ची असेल. स्क्रीन TUV Rheinland सर्टिफिकेशन सोबत येईल. कंपनीने हा फोन बजेटमधील सर्व डिस्प्ले फीचर्ससोबत मिळेल, असं म्हटलं आहे.

या व्यतिरिक्त कंपनीने फोनमध्ये (Realme P1 5G Sale Offer) रेनवॉटर टच फीचरही दिला आहे . स्मार्टफोन MediaTek Dimensity 7050 प्रोसेसर वर काम करेल. हा फोन तुम्हाला फिनिक्स रेड आणि फिनिक्स ग्रीन या कलरमध्ये मिळेल. याच्यात 5000mAhची बॅटरी आणि 45W ची चार्जिंग मिळेल. ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल.

News Title- Realme P1 5G Sale Offer 

महत्त्वाच्या बातम्या –

दिल्लीने विजय मिळवून पॉईंट टेबलचे बदलवले आकडे; हे आहेत टॉप 4 संघ

भर मैदानात ऋषभ पंत पंचासोबत भिडला; नेमकं काय घडलं?

राजस्थानचे शिलेदार पंजाबचा धुव्वा उडवण्यास सज्ज; आज रंगणार PBKS vs RR सामना

या राशीच्या व्यक्तीने फसवणुकीपासून सावध राहावे

दिनेश कार्तिकची बॅटिंग पाहून भरमैदानात रोहित म्हणाला असं काही की…, व्हिडीओ व्हायरल

Join WhatsApp Group

Join Now