महत्वाची बातमी! १०, २० आणि ५० रुपयांच्या नोटांबाबत आरबीआयने घेतला मोठा निर्णय

On: March 13, 2026 7:44 PM
RBI Proposes E-Cheque System
---Advertisement---

RBI Special ATM News | देशातील नागरिकांसाठी नोटांबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. लहान मूल्याच्या नोटांचा वापर सुलभ व्हावा यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) विशेष पाऊल उचलले आहे. आता नागरिकांना एटीएममधून थेट 10, 20 आणि 50 रुपयांच्या नोटा मिळाव्यात यासाठी नवीन प्रणाली सुरू करण्याची तयारी करण्यात आली आहे. (10 20 50 Rupee Notes Update)

सुट्या पैशांच्या कमतरतेमुळे अनेकदा नागरिकांना किरकोळ व्यवहार करताना अडचणी येतात. ही समस्या दूर करण्यासाठी RBI कडून ‘स्मॉल व्हॅल्यू डिस्पेंसर’ नावाचा पायलट प्रोजेक्ट सुरू करण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे एटीएममधून लहान नोटा सहजपणे मिळू शकतील.

‘स्मॉल व्हॅल्यू डिस्पेंसर’द्वारे मिळणार लहान नोटा :

या नवीन प्रकल्पांतर्गत काही ठिकाणी विशेष एटीएम मशीन बसवण्यात येणार आहेत. या मशीनमधून नागरिकांना थेट 10, 20 आणि 50 रुपयांच्या नोटा काढता येतील. सध्या बहुतेक एटीएममधून 200 किंवा 500 रुपयांच्या नोटाच जास्त प्रमाणात मिळतात.

नवीन मशीनमध्ये विशेष कॅसेट्स बसवण्यात येणार असून त्यातून फक्त लहान मूल्याच्या नोटाच वितरित केल्या जातील. त्यामुळे रिक्षा भाडे, भाजीपाला खरेदी किंवा छोट्या व्यवहारांसाठी लागणाऱ्या सुट्या पैशांची अडचण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

RBI Special ATM News | देशात लहान नोटांचा तुटवडा नाही :

दरम्यान, संसदेत बोलताना आर्थिक राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी देशात 10, 20 आणि 50 रुपयांच्या नोटांचा कोणताही तुटवडा नसल्याचे स्पष्ट केले आहे. सरकारने दिलेल्या माहितीनुसार, 26 फेब्रुवारी 2026 पर्यंत देशभरात 10 रुपयांच्या 439.40 कोटी, 20 रुपयांच्या 193.70 कोटी आणि 50 रुपयांच्या 130.30 कोटी नोटांचा पुरवठा करण्यात आला आहे. (Small Value Dispenser ATM)

याशिवाय 10 रुपयांच्या नोटांचा पुरवठा मागील काही काळात दुपटीने वाढवण्यात आला आहे. या निर्णयामुळे नागरिकांच्या दैनंदिन व्यवहारात सुट्या पैशांची समस्या कमी होईल आणि ग्रामीण तसेच शहरी भागातील अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे.

News Title: RBI To Launch Special ATM For 10, 20 And 50 Rupee Notes With Small Value Dispenser

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now