Ravindra Jadeja | सोमवारी खेळलेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यातील लढत एकतर्फी ठरली. मात्र या सामन्यात एक भावनिक क्षण सर्वांचे लक्ष वेधून गेला. रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) मैदानावरच भावूक झाल्याचे पाहायला मिळाले आणि त्याचा व्हिडिओही समोर आला आहे.
CSK जयघोष ऐकताच जडेजा झाला भावूक
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चेन्नईचा संघ १९.४ षटकांत १२७ धावांवर आटोपला. राजस्थानने हे लक्ष्य केवळ १२.१ षटकांत दोन गडी गमावून सहज पार केले. मात्र सामन्यादरम्यान नवव्या षटकात एक खास प्रसंग घडला. सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असताना चाहत्यांनी ‘CSK-CSK’ असा जयघोष सुरू केला. हा आवाज ऐकताच जडेजा आपल्या भावना रोखू शकला नाही आणि त्याच्या डोळ्यात अश्रू आले. तब्बल १३ वर्षे सीएसकेसोबत खेळलेल्या जडेजासाठी हा क्षण अत्यंत भावनिक ठरला.
Ravindra Jadeja got emotional while playing against his former team, CSK. 💔#RavindraJadeja #Jadeja #CSK #IPL #IPL2026 #Cricket #CricketFans #IndianCricket #IPLUpdates #CricketReels #CricketLovers #Dhoni #CSKFans pic.twitter.com/mCAClf3dof
— Team India 2.0 (@teamindia_2_0) March 30, 2026
या सामन्यात राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ओलसर खेळपट्टीचा फायदा घेत त्यांच्या वेगवान गोलंदाजांनी सुरुवातीलाच चेन्नईला मोठा धक्का दिला. संघ ६० धावांवर ६ गडी गमावून अडचणीत सापडला होता.दरम्यान, जडेजाने सरफराज खान (Sarfaraz Khan) आणि शिवम दुबे (Shivam Dube) यांना बाद करत आनंद साजरा केला. दुबेने षटकार मारल्यानंतर पुढील चेंडूवर झेलबाद झाल्यावर जडेजाने खास स्टाइलमध्ये जल्लोष केला.
जडेजाला रडताना पाहून चाहत्यांनी सोशल मीडियावर त्याला मोठा पाठिंबा दिला. एका चाहत्याने लिहिले की, “तू राजस्थानकडून खेळत असलास तरी आमच्यासाठी तू नेहमीच खास आहेस.” या सामन्यात जेमी ओव्हरटन (Jamie Overton) याने ४३ धावा करत चेन्नईला काहीसा आधार दिला. मात्र वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) याच्या १७ चेंडूंतील ५२ धावांच्या तुफानी खेळीमुळे राजस्थानने सहज विजय मिळवला. यशस्वी (Yashasvi Jaiswal) ३८ धावांवर नाबाद राहिला. आता चेन्नईचा पुढील सामना ३ एप्रिल रोजी पंजाबविरुद्ध चेपॉकमध्ये होणार आहे, तर राजस्थान ४ एप्रिल रोजी अहमदाबादमध्ये गुजरातविरुद्ध खेळणार आहे.








