हा झेल नाही पाहिला तर काय पाहिलं?, रवींद्र जडेजानं घेतलेल्या झेलची तुफान चर्चा

On: April 20, 2024 8:32 AM
Ravindra Jadeja Catch
---Advertisement---

Ravindra Jadeja Catch l रवींद्र जडेजा हा जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक मानला जातो. याचे उदाहरण पुन्हा एकदा आयपीएल 2024 मध्ये पाहायला मिळाले. रवींद्र जडेजा चेन्नई सुपर किंग्जकडून लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध मैदानात उतरला. भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा 8 विकेट्सनी पराभव झाला पण हा सामना जडेजासाठी खूप खास होता.

Ravindra Jadeja Catch l सुपरमॅन जडेजाने घेतला जबरदस्त झेल :

या सामन्यात रवींद्र जडेजाने हवेत उडी मारून एका हाताने झेल घेतला आहे. हा झेल लखनऊचा कर्णधार केएल राहुलचा होता. राहुलने 18व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर पाथिरानाविरुद्ध कट केला. पॉइंटवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या जडेजाने हवेत उडणारा चेंडू डाव्या हाताने पकडला. हा झेल पाहिल्यानंतर चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाड देखील थक्क झाला.

या सामन्यात रवींद्र जडेजाने फलंदाजी देखील अप्रतिम केली आहे. चेन्नई सुपर किंग्जने त्याला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवले होते. याचा फायदा घेत रवींद्र जडेजाने अर्धशतक ठोकल आहे. त्याच्या बॅटने 40 चेंडूत 5 चौकार आणि एक षटकार ठोकला आहे. मधल्या फळीत जडेजाने चेन्नईचा डाव सांभाळला आणि संघाला 176 धावांपर्यंत नेले, मात्र जडेजाची खेळी व्यर्थ ठरली.

केएल राहुलची केली दमदार कामगिरी :

कर्णधार केएल राहुल (82) आणि क्विटन डी कॉक (54) यांच्यातील पहिल्या विकेटसाठीच्या शतकी भागीदारीच्या जोरावर लखनौ सुपर जायंट्सने चेन्नई सुपर किंग्जवर एक ओव्हर शिल्लक असताना आठ गडी राखून सहज विजय मिळवला आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने सहा विकेट्सवर 176 धावांची आव्हानात्मक धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात लखनौने 19 षटकांत 2 बाद 180 धावा करून सामना जिंकला आहे.

मात्र या सामन्यावेळी रवींद्र जडेजाने उत्तम कामगिरी केली असून त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याच्या अप्रतिम झेलने सर्वानाच धक्का दिला आहे.

News Title – Ravindra Jadeja Catch

महत्त्वाच्या बातम्या – 

“मी सध्या अजित पवार गटात आहे, मात्र अजित पवारांना पाडूनच पक्ष सोडणार”

या राशीच्या व्यक्तींने प्रतिस्पर्ध्यावर लक्ष ठेवावे

भाषण सुरू असतानाच शरद पवारांकडे फेकली वस्तू, नेमकं काय घडलं?

नाची, डान्सर, बबली म्हणणाऱ्या राऊतांना नवनीत राणांनी दिलं प्रत्युत्तर, म्हणाल्या…

‘सुनेला हिणवणाऱ्या पवारांना सीतामाईंचा कळवळा म्हणजे ढोंगच’, भाजपचा टोला

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now