“त्यांच्याकडे पहिलवान असले, तर…”; रविंद्र धंगेकरांचा मुरलीधर मोहोळ यांना टोला

On: March 24, 2024 12:48 PM
Exit Poll 2024
---Advertisement---

पुणे | महाविकास आघाडीकडून पुणे लोकसभेची उमेदवारी आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना जाहीर झाल्यानंतर त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची पुण्यात भेट घेतली. शरद पवार आणि धंगेकर यांच्यात जवळपास अर्धा तास चर्चा झाली. त्या चर्चेनंतर धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी माध्यमांशी संवाद साधताना अनेक विषयांवर भूमिका मांडली. यावेळी बोलताना धंगेकर यांनी भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना टोला लगावला आहे.

धंगेकरांचा मुरलीधर मोहोळ यांना टोला

महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी निवडणुकीच्या प्रचारार्थ शहरातील पहिलवानांची बैठक घेतली. त्यामुळे आगामी निवडणुकीत तुम्हाला पहिलवानांचा सामना करावा लागणार का, या प्रश्नावर धंगेकरांनी उत्तर दिलं.

मुरलीधर मोहोळ यांना एकच सांगू इच्छितो की, त्यांच्याकडे पहिलवान जरी असले तरी आमच्याकडे वस्ताद आहेत, अशा शब्दात त्यांनी मुरलीधर मोहोळ यांना टोला लगावला.

Ravindra Dhangekar नेमकं काय म्हणाले?

पहिलवान हे सर्वसामान्य कुटुंबातील आणि समाजाचे रक्षण करण्यासाठी असतात.पूर्वी प्रत्येक घरात एक पहिलवान असायचा, तो गावाचा आणि कुटुंबाचे रक्षण करायचा, त्यामुळे पहिलवान हा सर्वांचा असतो. तो कोणत्याही पक्षाला बांधिल नसतो. त्यामुळे मुरलीधर मोहोळ यांनी किती पहिलवानांना अर्धा लिटर दूध पाजले, याबाबतचा हिशेब त्यांनी दिला पाहिजे, असं धंगेकरांनी म्हटलंय.

त्यांनी कधीही आमच्या गरीब पहिलवान लोकांना अर्धा लिटर दूध पाजले नाही. त्यामुळे त्यांनी पहिलवान जरी आणले असले, तरी ते कोणत्याही पक्षाचे बांधिल नसतात. तर सर्व समाजाचे असतात, असं त्यांनी म्हटलंय.

देशाच्या उभारणीमध्ये शरद पवारांचं मोठं योगदान आहे. त्यांनी प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाचा आगामी निवडणुकीत नक्कीच फायदा होईल, असं धंगेकरांनी म्हटलंय.

महत्त्वाच्या बातम्या- 

नोकरी गेली तरी बँका सहज देणार Personal Loans; जाणून घ्या प्रक्रिया!

देशांतर्गत क्रिकेटला येणार ‘अच्छे दिन’, BCCI ची भारी योजना, खेळाडू होणार मालामाल!

24.75 कोटींच्या स्टार्कची जोरदार धुलाई; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस!

शाहरुख खानच्या कृत्याने वाद! किंग खान स्टेडियममध्ये ‘हे’ करताना दिसला!

KKR साठी हिरो ठरला पण चूक ‘लय’ भोवली; युवा खेळाडूवर मोठी कारवाई!

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now