पुण्याचं राजकारण तापलं! घायवळ गँग कनेक्शनवरून धंगेकरांचा चंद्रकांत पाटलांवर पुन्हा गंभीर आरोप

On: October 8, 2025 3:30 PM
Nilesh Ghaiwal News
---Advertisement---

Ravindra Dhangekar | पुणे शहरात घडणाऱ्या सततच्या गुन्हेगारी घटनांमुळे वातावरण आधीच तापलेलं असताना, आता राजकीय क्षेत्रातही खळबळ उडाली आहे. शिवसेना नेते रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी पुन्हा एकदा मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर गंभीर आरोप करत राजकीय वाद पेटवला आहे. धंगेकर यांनी पाटील यांच्यावर घायवळ गँगशी (Ghaywal Gang) कनेक्शन असल्याचा थेट आरोप केला असून, त्यामुळे पुण्यातील राजकीय वातावरण आणखी तंग झालं आहे.

कोथरूड परिसरात झालेल्या गोळीबार प्रकरणानंतर पोलिसांनी घायवळ टोळीवर कारवाई केली होती. या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटलांना निलेश घायवळ (Nilesh Ghaiwal) याबाबत प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी “I Am Sorry” असं म्हणत विषय टाळला. मात्र, या प्रतिक्रियेनं सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.

“चंद्रकांतदादांच्या ताटाखाली काय चालतंय?” — धंगेकरांचा थेट सवाल :

रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, “चंद्रकांत पाटील (Chandrkant Patil) आत्मचिंतन करत असतील, पण त्यांच्या ताटाखाली काय चालतंय हे त्यांना माहिती नाही का?”, त्यांनी आरोप केला की, “समीर पाटील हा मोक्याचा गुन्हेगार असून, त्याचाच निलेश घायवळसोबत संबंध होता. पोलीसही सांगतात की समीर पाटील पोलिसांवर दादागिरी करतो. मग गृहखात्याच्या मंत्र्यांच्या कामकाजात असा व्यक्ती कसा आहे?”

धंगेकर यांनी याच संदर्भात पोलीस महासंचालकांना पत्र लिहून तपासाची मागणी केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, “जर पोलिसांना आंदेकर यांच्यावर बुलडोझर फिरवता येतो, तर कोथरूडमधील घायवळ गँगवरही तसंच केलं पाहिजे.”

Ravindra Dhangekar | “मानहानीचा खटला दाखल करा, मी तयार आहे” — धंगेकरांचा प्रतिहल्ला :

धंगेकरांच्या या वक्तव्यावर प्रत्युत्तर देताना समीर पाटील यांनी “धंगेकर यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल करू” असं सांगितलं. मात्र, त्यावर धंगेकर म्हणाले, “मला कोर्टात कधी नेणार याचीच मी वाट पाहतोय.”

त्यांनी पुढे स्पष्ट केलं की, “गुन्हेगारांना जे राजकीय पाठबळ देतायत, त्यांची दादागिरी बंद करण्याची वेळ आली आहे. चंद्रकांत दादांना विचारायला हवं की त्यांच्या कामकाजात असलेल्या लोकांकडे १०० कोटींची प्रॉपर्टी कशी आली?”

धंगेकर यांनी पाटील यांच्यावर निशाणा साधताना म्हटलं की, “पोलिस स्टेशनमध्ये बसून गुन्हेगारांच्या तक्रारी दाबल्या जात आहेत. हे सगळं थांबवणं आता गरजेचं आहे.”

News Title: Ravindra Dhangekar Again Targets Chandrakant Patil Over Ghaywal Gang Connection | Pune Politics Heats Up

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now