क्रिकेटपटू Ravichandran Ashwin च्या पत्नीचा मोठा खुलासा! म्हणाली..

On: February 19, 2024 7:07 PM
Ravichandran Ashwins wife prithi narayanan post
---Advertisement---

Ravichandran Ashwin | कसोटी क्रिकेटमध्ये 500 विकेट पूर्ण करणारा दुसरा भारतीय ठरल्यानंतर रविचंद्रन अश्विनची पत्नी पृथि नारायणन हिने अश्विनवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. कौटुंबिक अडचणीमुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर अश्विनने (Ravichandran Ashwin) अनपेक्षितपणे तिसऱ्या कसोटीतून माघार घेतली होती. त्यानंतर तो राजकोटला परतला होता.

भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात राजकोट येथे झालेल्या सामन्यात स्पिनर रविचंद्रन अश्विनने 500 विकेट पूर्ण केले. हा रेकॉर्ड करणारा तो दुसरा भारतीय क्रिकेटपटू ठरला. अश्विनच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक करण्यात आले. याबाबत आता त्याच्या पत्नीने देखील त्याच्यासाठी एक भावनिक नोट लिहिली आहे.

हा रेकॉर्ड रचल्यानंतर काही तासांतच अश्विनला कसोटी सामन्यातून अचानक माघार घ्यावी लागली. बीसीसीआयने अश्विनला मायदेशी परतण्यासाठी चार्टर्ड फ्लाइटची व्यवस्थादेखील केली होती. चौथ्या दिवशी चहापानानंतर अश्विन भारतीय संघात सामील झाला आणि त्याने सहा षटके टाकली आणि एक विकेटही घेतली. 557 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने इंग्लंडचा डाव 122 धावांत गुंडाळला आणि दणदणीत विजय मिळवला.

Ravichandran Ashwin च्या पत्नीची भावनिक पोस्ट

अश्विनच्या या कामगिरीचे त्याच्या पत्नीने कौतुक करत इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे.”आम्ही या 500 विकेटची हैद्राबाद टेस्ट पासून वाट बघितली, मात्र तिथे काही झाले नाही. यानंतर मी 1 टन मिठाई खरेदी केली आणि माझ्या परिवाराला वाटली.  या 500 आणि 501 मध्ये खूप काही घडलं. आमच्या आयुष्यातील हे 48 तास सर्वांत लांब क्षण होते.  मला तुझ्यावर खूप अभिमान आहे. मी तुझ्यावर खूप जास्त प्रेम करते. तु एक अद्भुत मनुष्य आहेस.”, अशा आशयाची पोस्ट अश्विनची पत्नी पृथि नारायणनने केली आहे. तिची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे.

पंतप्रधान मोदींनीही केले अश्विनचे कौतुक

“करीअरमध्ये 500 विकेट घेऊन, हा जो असामान्य महत्त्वाचा टप्पा गाठलाय, त्याबद्दल अश्विन तुला शुभेच्छा. अश्विनचा हा जो प्रवास आहे, कर्तुत्व आहे, त्यातून त्याचं कौशल्य आणि चिकाटीची साक्ष मिळते. माझ्या मनापासून अश्विनला शुभेच्छा, त्याने करीअरमध्ये अजून उंची गाठावी”, असे ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अश्विनचे (Ravichandran Ashwin) कौतुक केले होते.

रविचंद्रन अश्विनने केला रेकॉर्ड

स्पिनर रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) 500 विकेट पूर्ण करत नवीन रेकॉर्ड केला आहे. भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये (IND vs ENG) सर्वाधिक 619 विकेट घेण्याचा विक्रम अनिल कुंबळे यांच्या नावावर आहे.अश्विनने इंग्लंड विरुद्ध तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी 500 विकेट पूर्ण केले.

News Title-  Ravichandran Ashwins wife Prithis emotional post

महत्त्वाच्या बातम्या –

राज्यात पेट्रोल-डिझेलचे भाव उतरले?, जाणून घ्या आजचे दर

बाजारात नव्या बाईकची एंट्री; Kawasaki ची जबरदस्त बाईक लाँच, जाणून घ्या किंमत

शरद पवारांना बसणार आणखी एक मोठा धक्का!

आयेशा टाकियाने सोडलं मौन, ट्रॉलर्सला दिलं सडेतोड उत्तर; म्हणाली…

अमिताभ बच्चन यांचा सर्वांत मोठा खुलासा; म्हणाले, “15 तास स्वतःला खोलीमध्ये..”

Join WhatsApp Group

Join Now