रवी राणा यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ, म्हणाले ‘उद्धव ठाकरे…’

On: January 27, 2025 5:30 PM
Ravi Rana
---Advertisement---

Ravi Rana l शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गटात फूट पडणार असल्याचा दावा केला होता. यानंतर त्यांनी भाजपवर पक्ष फोडल्याचा आरोपही केला होता. त्यांनी म्हटलं की, “ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि मूळ शिवसेना फोडली गेली, तशीच फूट अजित पवार (Ajit Pawar) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात पडेल.” यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे निकटवर्तीय आणि युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे.

रवी राणा यांनी खळबळजनक दावा करत सांगितलं की, “संजय राऊत यांना कल्पना नाही. ते आधीही अंधारात होते, आणि अजूनही अंधारातच आहेत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात मोठ्या प्रमाणात गुप्त रणनीती सुरू आहे. येत्या काळात उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व स्वीकारतील.”

रवी राणा यांचा मोठा दावा :

रवी राणा म्हणाले, “उद्धव ठाकरे हे लवकरच भाजपसोबत दिसतील. त्यांच्या या निर्णयाने संजय राऊत यांना मोठा धक्का बसेल. फडणवीस आणि ठाकरे यांच्यातील रणनीती संजय राऊत यांच्या लक्षात येत नाही.” राणा यांनी फडणवीस यांची स्तुती करत सांगितलं की, “देवेंद्र फडणवीस यांनी मोठं मन दाखवत मुख्यमंत्रीपद सोडलं आणि उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं. भाजपसाठी सत्ता आणि स्थिरता महत्त्वाची आहे.”

Ravi Rana l संजय राऊत यांचे आरोप आणि रवी राणा यांची प्रतिक्रिया :

संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीका करत म्हटलं होतं की, “एकनाथ शिंदेंना सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी खटल्यांचा दबाव होता. त्यांनी आपली कातडी वाचवण्यासाठी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला.”

यावर रवी राणा यांनी प्रत्युत्तर देताना सांगितलं की, “देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे यांना मुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय घेतला होता. हा भाजपचा मोठेपणा दाखवणारा निर्णय होता, आणि आता सत्ता पूर्णपणे भाजपच्या हातात आहे.”

ठाकरे गटात फूट :

संजय राऊत यांनी शिंदे गटात फूट पडण्याची शक्यता व्यक्त केली, मात्र रवी राणा यांनी याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे भाजपसोबत जाण्याची शक्यता वर्तवली. या चर्चेमुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात नवा उलथापालथीचा अंदाज वर्तवला जात आहे. ठाकरे गटातील नेत्यांच्या हालचालींवर आणि भाजपसोबतच्या संभाव्य समीकरणांवर राज्याचं लक्ष केंद्रित झालं आहे.

News Title: Ravi Rana Hits Back at Sanjay Raut; Claims Uddhav Thackeray Will Join BJP

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now