“..तर बॉलीवुड इंडस्ट्रीच संपेल”, प्रसिद्ध अभिनेत्रीचं खळबळजनक वक्तव्य

On: February 26, 2024 10:22 PM
Raveena Tandon big statement
---Advertisement---

Raveena Tandon | बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये घराणेशाहीला अधिक महत्व दिले जाते, याबाबत नेहमीच बोलले जाते. अनेक बड्या कलाकारांनी यावर बोलूनही दाखवलं आहे. आता प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडनने (Raveena Tandon) यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’च्या पर्वाला आजपासून (26 फेब्रुवारी) सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्रात अभिनेत्री रवीना टंडन उपस्थित होती. यावेळी तिने अनेक विषयांवर चर्चा करत अनेक खुलासे देखील केले.

नेपो किड्सबद्दल रवीनाचा मोठा खुलासा

नेपोटिझमबद्दल सवाल केल्यावर रवीना टंडनने रोखठोकपणे आपले मत त्यावर दिले. जर तुम्ही नेपो किड्सबद्दल बोलत आहात तर आमचे अर्धे पोलिटिक्स आणि इंडस्ट्री संपेल. असं रवीना (Raveena Tandon) म्हणाली आहे.तिच्या या विधानाची आता जोरदार चर्चा होत आहे.

रवीनाचे वडील प्रसिद्ध चित्रपट निर्माते होते. त्यामुळे तिला खूप अगदी पासूनच चित्रपटांच्या ऑफर्स येत होत्या.मात्र, रवीनाला अभिनयाट काहीच रस नसल्याचे ती सांगते. मला सुरुवातीच्या काळापासूनच चित्रपटांच्या खूप जास्त ऑफर्स येत होत्या. मात्र, मी सतत चित्रपटांसाठी नकार देत होते. मला दिग्दर्शनामध्ये जायचे होते. यामुळेच मी चित्रपटांना नकार देत होते. असा खुलासा यावेळी रवीनाने केला.

‘कर्मा कॉलिंग’ सिरिजमुळे रवीना चर्चेत

‘मैने प्यार किया’ या चित्रपटाला देखील नकार दिल्याचे रवीनाने सांगितले. रवीना टंडनची (Raveena Tandon) मुलगी राशा थडानी ही देखील आता लवकरच बाॅलिवूडमध्ये पदार्पण करण्यास तयार आहे. याबाबतही तिला अनेक सवाल करण्यात आले.

रवीनाने मोहरा, दुल्हे राजा, अंदाज अपना अपना,दिलवाले , केजीफ अशा मोठ्या चित्रपटांत काम करत बॉलीवुडमध्ये आपली छाप सोडली आहे. यासोबतच ती टीव्ही मालिकेतही झळकली आहे. नुकतीक ती ‘कर्मा कॉलिंग’ या सिरिजमध्ये दिसली. यातील तिच्या अभिनयाचे सर्वत्रच कौतुक केले जात आहे.

News Title –  Raveena Tandon big statement about nepotism

महत्त्वाच्या बातम्या –

मनोज जरांगे पाटील माघारी फिरले, मराठा बांधवांना केलं महत्त्वाचं आवाहन

“सागर बंगल्याबाहेरील मोठी भिंत पार करा…”; नितेश राणेंचं जरांगेंना आव्हान

सदावर्तेंनी शरद पवारांचं नाव घेत केली ‘ही’ मोठी मागणी

‘खुमखुमी असेल तर फडणवीस यांनी…’; जरांगे भडकले

आदित्य ठाकरेंकडून एकनाथ शिंदेंना चॅलेंज, म्हणाले…

Join WhatsApp Group

Join Now