अखेर निवडणुकीचा निकाल जाहीर! निवडणुकीत मिळवला ऐतिहासिक विजय

On: December 8, 2025 7:23 PM
Barshi Election Result
---Advertisement---

Barshi Election Result | बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा निकाल अखेर जाहीर झाला असून या स्पर्धेत माजी आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांच्या पॅनलने बाजी मारली आहे. राज्यभर रंगलेल्या निवडणूक वातावरणात बार्शीकडे लक्ष लागले होते आणि निकाल समोर येताच राऊत गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले.

बार्शी बाजार समितीत राऊत गटाची एकहाती सरशी :

बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागांसाठी घेतलेल्या निवडणुकीत राऊत पॅनलने सर्व जागांवर वर्चस्व प्रस्थापित केले. एकूण 18 पैकी 16 जागांवर थेट निवडणूक पार पडली, तर उर्वरित 2 जागांवर आधीच बिनविरोध उमेदवार निवडून आले होते. या सर्व जागांवर माजी आमदार राऊत यांच्या गटाला मतदारांनी विश्वासाचा कौल दिला. दुसरीकडे विद्यमान आमदार दिलीप सोपल (Dilip Sopal) यांच्या गटातील एकही उमेदवार विजयी ठरू शकला नाही, त्यामुळे या पक्षाला मोठा धक्का बसला. निकाल जाहीर होताच राऊत गटाच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला.

निकालानंतर बोलताना राऊत यांनी सांगितले की, या विजयाचे संपूर्ण श्रेय मतदारांना जाते. कारण सहकार क्षेत्रातील ही एक कठीण परीक्षा होती. सोसायटी, ग्रामपंचायती आणि व्यापारी वर्गाने दिलेल्या सहकार्यामुळे त्यांच्या पॅनलचा आत्मविश्वास अधिक बळकट झाला. हमाल-तोलार मतदारसंघातून मिळालेली बिनविरोध निवड त्यांच्या संघासाठी महत्त्वाची ठरली. त्यांनी नमूद केले की, मतदारांनी दिलेल्या ताकदीच्या जोरावरच सर्व 18 उमेदवार विजयी झाले असून पुढील काळात बार्शीच्या विकासासाठी ते कटिबद्ध आहेत.

Barshi Election Result | राऊत यांची पहिली प्रतिक्रिया :

निकालानंतर भावना व्यक्त करताना राऊत म्हणाले की, विधानसभा पराभवानंतर जनतेत असलेली ‘राजूभाऊंना ताकद देणे गरजेचे’ ही भावना या निकालातून स्पष्ट दिसून येते. या निवडणुकीत प्रतिष्ठेची लढाई नसून जनसेवेसाठीची धडपड होती, असे त्यांनी सांगितले. बार्शी तालुक्याचा विकास थांबू नये या हेतूने त्यांनी सतत काम केले असल्याचे राऊत यांनी सांगितले.

पुढे ते म्हणाले की, प्रतिष्ठा किंवा अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला तरी 10 पावले मागे घ्यावी लागली तरी हरकत नाही, मात्र तालुक्याचा विकास रोखला जाणार नाही. राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री अजित दादा (Ajit Pawar) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या मार्गदर्शनाखाली विकास कामांना गती देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच जयभाऊ गोरे (Jaybhau Gore) यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांनी विशेष आभार व्यक्त केले.

News Title: Raut Panel Sweeps Barshi Election

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now