सख्ख्या भावांमध्ये वाद?; रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठी खळबळ

On: May 1, 2024 9:16 PM
Ratnagiri Sindhudurg Loksabha
---Advertisement---

Uday Samant & Kiran Samant | सख्खा भाऊ पक्का वैरी अशी परिस्थिती आता कोकणाच्या राजकारणात पाहायला मिळत आहे. सख्ख्या भावाच्या कार्यकर्त्यांनी सख्ख्या भावाच्या कार्यालयावरील बॅनर हटवले असल्याचा धक्कादायक प्रकार हा कोकणमध्ये घडला आहे. हे दोन भाऊ इतर दुसरे तिसरे कोणीही नसून हे शिंदे गटाचे नेते उदय सामंत आणि किरण सामंत (Uday Samant & Kiran Samant) आहेत. दोन्ही भावांच्या समर्थकांमध्ये जुंपलेली पाहायला मिळाली आहे. उदय सामंत यांच्या संपर्क कार्यालयावरील किरण सामंत यांच्या समर्थकांनी बॅनर काढले आहेत.

उदय सामंत यांच्या कार्यालयावरील बॅनर काढले

किरण सामंत यांच्या कार्यकर्त्यांनी उदय सामंत (Uday Samant & Kiran Samant) यांच्या कार्यालयावरील बॅनर काढले आहेत. त्याजागी किरण सामंत यांची बॅनरबाजी केली आहे. किरण सामंत यांच्यासोबत शिवसेना प्रमुख दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे, शिवसेना दिवंगत नेते आनंद दिघे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो बॅनरवर लावण्यात आले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ होण्याची शक्यता आहे. (Uday Samant & Kiran Samant)

News18

शिवसेना शिंदे गट रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात आपला उमेदवारी देण्यासाठी इच्छूक होते. शिंदे गटातून किरण सामंत यांना लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देण्याबाबत दावा केला होता. यासाठी शिंदे गट आणि उदय सामंत यांनी आपण माघार घेणार नसल्याचं सांगितलं होतं. मात्र अंतिम टप्प्यामध्ये ही जागा भाजपने आपल्या बाजूला वळवली. (Uday Samant & Kiran Samant)

नारायण राणे लोकसभेच्या रिंगणात

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यांनी प्रचारास सुरूवात केलीये. तर दुसरीकडे ठाकरे गटातून विनायक राऊत यांना उमेदवारी देण्यात आलीये. तिसऱ्या टप्प्यात येत्या 7 मे रोजी हे मतदान होणार आहे. याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, याआधी विनायक राऊत यांनी मी लोकसभा निवडणुकीत अडीच लाख मतांनी निवडून येणार असल्याचं वक्तव्य केलं. तर दुसरीकडे नारायण राणे यांनी माध्यमांशी बोलत असताना मी तीन लाख मतांनी विजयी होणार असल्याचा विश्वास नारायण राणे यांनी दाखवला.

येत्या 7 मे रोजी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील मतदार कोणाला मत देतील हे निकला दिवशीच समजेल. दरम्यान चुरशीली लढाई होणार असल्याची चर्चा आहे. तर भाजपकडून दडपशाहीचा वापर करून मत मिळवण्यात येत असल्याच्या चर्चा आहेत.

News Title – Ratnagiri Sindhudurg Loksabha Kiran Samant Supporter Remove Banner Of Uday Samant Office

महत्त्वाच्या बातम्या

“दमदाटी करायची भाषा करणं सोडून द्या नाहीतर…”, अमोल कोल्हेंचा अजित पवारांना इशारा

“मी इतक्या लाख मतांनी विजयी होईल”, नारायण राणेंचं मोठं वक्तव्य

ऐश्वर्याला दिग्दर्शकाने केला होता चुकीचा स्पर्श, सलमानने…; अभिनेत्रीचा मोठा खुलासा

पुण्यातून आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्यावर भर- मुरलीधर मोहोळ

“थोडं कमी पीत जा”; प्रसिद्ध अभिनेत्रीचा व्हिडीओ तूफान व्हायरल

Join WhatsApp Group

Join Now