रेशनकार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी; सरकारची मोठी घोषणा

On: April 9, 2025 8:24 AM
Maharashtra Ration Card
---Advertisement---

Ration Card | शिधापत्रिका धारकांसाठी सरकारने मोठा दिलासा दिला असून, आधार क्रमांक जोडून करावयाच्या ई-केवायसी प्रक्रियेची अंतिम मुदत आता ३० एप्रिल २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे. या निर्णयामुळे अद्याप ई-केवायसी न केलेल्या लाभार्थ्यांना अजून संधी मिळणार आहे.

ई-केवायसीसाठी सरकारची मोठी घोषणा

शिधापत्रिकेवर आधार क्रमांक जोडण्याच्या कामासाठी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. या प्रक्रियेचे उद्दिष्ट म्हणजे लाभार्थ्यांची अचूक नोंद आणि गरजूंना योग्य लाभ पोहोचवणे हे आहे. राज्य सरकारने सुरुवातीला अंतिम मुदत ३१ मार्च २०२५ निश्चित केली होती. मात्र, अद्याप जिल्हानिहाय मोठ्या संख्येने लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण झालेली नाही. यामुळे आता अंतिम मुदत ३० एप्रिल २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे.

जिल्हास्तरावर प्राप्त माहितीप्रमाणे पुणे जिल्ह्यातील जवळपास १८ लाख शिधापत्रिकांपैकी केवळ १३ लाख २० हजार कार्डधारकांचीच ई-केवायसी पूर्ण झाली आहे. म्हणजेच ५ लाखांहून अधिक लोक अद्याप या प्रक्रियेपासून वंचित आहेत. ही आकडेवारी पाहता राज्य शासनाने ही महत्त्वाची मुदतवाढ जाहीर केली आहे.

काम पूर्ण न केल्यास अन्नधान्य बंद होण्याची शक्यता

राज्य शासनाच्या आदेशानुसार ३० एप्रिलनंतर ज्यांची ई-केवायसी पूर्ण नसेल, त्यांचे शिधापत्रिका लाभ त्वरित बंद करण्यात येणार आहेत. यामुळे रेशनवरील अन्नधान्य व इतर शासकीय योजनांचा लाभ थांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी तातडीने आपले आधार क्रमांक शिधापत्रिकेशी लिंक करून ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्हा प्रशासनाची तयारी

पुणे जिल्ह्यात एकूण २७ लाख ६९ हजार ३७१ शिधापत्रिका धारक आहेत. त्यातील १३ लाख २० हजार कुटुंबांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. उर्वरित कुटुंबांवर प्रशासनाकडून लवकरच कार्यवाही केली जाणार आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सुर्यवंशी यांनी स्पष्ट केलं की, राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत मिळणाऱ्या लाभांचा लाभ सुरू ठेवायचा असेल, तर ई-केवायसी तातडीने पूर्ण करावी.

 Title: Ration Card eKYC Deadline Extended to April 30

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now