अश्विनची रेकॉर्डब्रेक कामगिरी, जे कोणी करून दाखवलं नाही ते केलं

On: March 9, 2024 7:31 PM
Ashwin
---Advertisement---

Ashwin | टीम इंडिया आणि इंग्लंड या दोन्ही संघामध्ये गेल्या काही दिवसांपासून कसोटी सामन्यांची मालिका सुरू होती. एकूण पाच कसोटी सामने या मालिकेमध्ये खेळवले गेले होते. त्यापैकी एकूण चार कसोटी सामन्यामध्ये टीम इंडियाने विजय मिळवल्याने भारतीयांचा आनंद गगणामध्ये मावेनासा झाला आहे. यामध्ये टीम इंडियाचा फिरकीपटू गोलंदाज आर. अश्विनने (Ashwin) चांगली कामगिरी केली आहे. त्याने विश्वविक्रम केला आहे.

अश्विनचा विश्वविक्रम

टीम इंडिया आणि इंग्लंडच्या पाचव्या सामन्यातील दुसरा डाव 9 मार्चला पार पडला आहे. त्या पाचव्या कसोटी सामन्यामध्ये आर अश्विनने (Ashwin) चांगली कामगिरी करत विश्वविक्रम केला आहे. त्याने आपल्या 100 व्या कसोटी मालिकेमध्ये चांगली कामगिरी करत टीम इंडियाला विजयाचा दावेदार बनवलं आहे.

अश्विनने (Ashwin) आपल्या 100 व्या कसोटी सामन्यामध्ये चांगली कामगिरी करत एकूण पाच विकेट्स मिळवले आहेत. यामुळे त्याने आता ऑस्ट्रेलियाचा दिवंगत माजी फिरकीपटू गोलंदाज शेन वॉर्नचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. तसेच श्रीलंकेचा फिरकीपटू माजी गोलंदाज मुरलीधरनला मागे टाकत आपलं एक पाऊल पुढं ठेवत अश्विनने (Ashwin) रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे.

अश्विन ठरला सक्सेसफुल

मुरलीधरन आणि शेन वॉर्न यांनी त्यांच्या 100 व्या कसोटी सामन्यामध्ये एकूण 8 विकेट्स घेतल्या होत्या. मात्र अश्विनने पाचव्या कसोटीमध्ये आणि त्यांच्या 100 व्या कसोटी सामन्यात एकूण 9 विकेट्स घेतल्या आहेत. पहिल्या डावामध्ये 4 तर दुसऱ्या डावामध्ये 5 विकेट्स अश्विनने घेतल्या आहेत.

विजयात मोलाचा वाटा

पाचव्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात अश्विनने चांगली कामगिरी करत इंग्लंडच्या फलंदाजांना घरचा रस्ता दाखवला आहे. आपल्या फिरकीच्या जादूने अप्रतिम फेकी करत त्याने टीम इंडियाच्या विजयात मोलाचा वाटा दिला आहे.

टीम इंडियच्या चारही कसोटी सामन्याच्या विजयामध्ये अश्विनने चांगली कामगिरी केली आहे. विजयामध्ये आर अश्विनचे महत्त्वाचे योगदान आहे. म्हणून अश्विन यापुढे कशी कामगिरी करेल हे पाहणं गरजेचं आहे.

News Title – Ashwin News Record his 100th Test Cricket

महत्त्वाच्या बातम्या

‘अशा’ घरात नेहमी असतो लक्ष्मीचा वास!

ग्राहकांना मोठा धक्का; सोनं महागलं, जाणून घ्या दर

‘अशा’ व्यक्तींचा सल्ला कधीच ऐकू नका, जीवनाचा होईल सर्वनाश!

‘आधी ते डिलीट कर’, सलमान खान चांगलाच भडकला; व्हिडीओ व्हायरल

पुण्याच्या उमेदवारीवरुन मोठा संघर्ष?, फडणवीस आणि तावडे आमने-सामने!

Join WhatsApp Group

Join Now