रश्मिका मंदानाने लग्नात घातले ११ पारंपारिक दागिने; किंमत वाचून तुम्हीही थक्क व्हाल

On: March 1, 2026 5:33 PM
Rashmika Mandanna (2)
---Advertisement---

Rashmika Mandanna | दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री रश्मीका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोंडा यांच्या विवाहसोहळ्याने संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं आहे. 26 फेब्रुवारी 2026 रोजी पार पडलेल्या या थाटामाटाच्या लग्नात रश्मिकानं परिधान केलेले खास दागिने विशेष चर्चेचा विषय ठरले आहेत. राजेशाही शैली, पारंपरिक सौंदर्य आणि कोटींच्या किंमतीमुळे हे दागिने सर्वत्र चर्चेत आले आहेत.

दहा महिन्यांची मेहनत, हैदराबादमधून साकारलेले दागिने :

लग्नासाठी रश्मिका मंदानानं (Rashmika Mandanna) निवडलेले दागिने अत्यंत खास पद्धतीनं तयार करण्यात आले होते. हे सर्व दागिने विशेषतः हैदराबाद येथील एका नामांकित ज्वेलर्स कंपनीकडून घडवण्यात आले होते. या दागिन्यांची निर्मिती तब्बल दहा महिन्यांपासून सुरू होती, अशी माहिती समोर आली आहे. प्रत्येक दागिन्यावर स्वतंत्रपणे काम करताना कारागिरांनी बारकाईनं लक्ष दिलं होतं.

या दागिन्यांच्या डिझाइनसाठी दक्षिण भारतीय मंदिरातील शिल्पकला आणि पारंपरिक राजेशाही परंपरेपासून प्रेरणा घेण्यात आली होती. सोन्याच्या नक्षीकामासोबतच सांस्कृतिक ओळख जपणारी रचना या दागिन्यांमध्ये दिसून येत होती. विवाहस्थळाची सजावटही भारताची परंपरा आणि राजेशाही थाट या संकल्पनेवर आधारित होती, त्यामुळे रश्मिकाचे दागिने संपूर्ण सोहळ्याशी एकरूप झाले होते. लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच तिच्या लूकची देशभर चर्चा सुरू झाली.

Rashmika Mandanna | रश्मिकाच्या अंगावर 11 दागिने, वजन तीन किलो :

या विवाहसोहळ्यात रश्मिकानं एकूण 11 प्रकारचे दागिने परिधान केले होते. यामध्ये चोकर, लांब हार, झुमके, माथ्यावरचा दागिना, बांगड्या, कमरपट्टा, पैंजण, नथ आणि बाजूबंद यांचा समावेश होता. रश्मिका आणि विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) यांनी परिधान केलेल्या दागिन्यांचं एकूण वजन साधारण तीन किलो असल्याचं सांगितलं जात आहे. विजयनेही हार, कडे, बाजूबंद आणि इतर सोन्याचे दागिने घालून राजेशाही थाट जपला होता.

या दोघांनी त्यांच्या दागिन्यांची नेमकी किंमत अधिकृतपणे जाहीर केलेली नसली तरी, या दागिन्यांची अंदाजे किंमत 4 ते 7 कोटी रुपयांच्या दरम्यान असल्याचं बोललं जात आहे. इतक्या मोठ्या किंमतीमुळे रश्मिकाच्या दागिन्यांनी चाहत्यांना अक्षरशः थक्क केलं आहे. त्यामुळे येत्या अनेक दिवसांपर्यंत रश्मिका-विजयचं हे लग्न आणि त्यातील झळाळीदार दागिने चर्चेचा विषय राहणार, यात शंका नाही.

News Title: Rashmika Mandanna’s Wedding Jewelry Worth Crores

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now