Rashmika Mandanna | अभिनेत्री रश्मिका मंदानाची क्रेझ संपूर्ण देशभरात आहे. रश्मिकाचे लाखो चाहते आहेत. अॅनिमल या चित्रपटामुळे चांगलीच प्रसिद्धी मिळाली. सोशल मीडियावर रश्मिकाची फॅन फॉलोइंग सुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे.
चाहत्यांसाठी रश्मिका (Rashmika Mandanna) आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर नवनवीन फोटो व्हि़डीओ शेअर करत असते. तिच्या अभिनयामुळे तिने प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे. कायम हसऱ्या चेहऱ्याने तिने लाखोंच्या मनात घर देखील केलं आहे. मात्र रश्मिका एका अभिनेत्यामुळे रडली असल्याचं समोर आलं.
काय आहे नेमका प्रकार?
रश्मिका (Rashmika Mandanna) आणि रणबीर या दोघांनी पहिल्यांदाच स्क्रिन शेअर केली. दोघांच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम देखील दिलं. दरम्यान, एका मुलाखतीमध्ये बोलत असताना रश्मिकाने नवा खुलासा केला आहे. ती म्हणाली की अॅनिमल चित्रपटात एका सीनमध्ये मला रणबीर कपूरच्या कानाखाली मारायची होती.
हा सीन करणं माझ्यासाठी फार अवघड होतं. पुढे ती म्हणाली की, ज्यावेळी तिने सीनमध्ये रणबीर कपूर याच्या कानाखाली मारली त्यावेळी मी जोरात ओरडत होते आणि मी रडत देखील होते. रश्मिका मंदाना म्हणाली, माझ्यासाठी खरोखरच हा सीन करणे खूपच जास्त अवघड काम होतं. मी स्वत: हा सीन केल्यानंतर खूप जास्त घाबरले होते.
पुढे काय घडलं?
रश्मिका म्हणाली की, सीन झाल्यावर मी काही वेळाने रणबीर कपूरकडे गेले त्यावेळेस त्याला विचारलं की सर्व ठिक आहे ना? मी हा सीन करताना माझ्या मनात काय सुरू आहे हेच मला कळत नव्हतं. मला फक्त सांगण्यात आलं की, एका पतीने पत्नीला चीट केलं आणि तो सीन लक्षात ठेव. बाकी माझ्या मनात काहीच नव्हतं असं रश्मिका म्हणाली.
रश्मिकाच्या लग्नाची चर्चा-
News Title : rashmika mandanna cries for this actor
महत्त्वाच्या बातम्या-
Ram Mandir | 22 तारखेला महाराष्ट्रात सुद्धा सुट्टी जाहीर, पाहा सरकारी आदेशात काय म्हटलंय
Pune News | अदानी कंपनीचं पुणेकरांना मोठं गिफ्ट!
PM Narendra Modi | सोलापूरकरांसमोर नरेंद्र मोदींना अश्रू अनावर, म्हणाले…
Taapsee Pannu | तापसी पन्नूचा सर्वांत मोठा खुलासा; म्हणाली, “10 वर्षांपासून एकाच..”
Rohit Pawar | सर्वात मोठी बातमी! रोहित पवारांना ईडीचा झटका






