‘रिव्हॉलव्हर घेऊन 24 तास…’; रणजीत कासलेंचा एन्काउंटरबाबत खळबळजनक दावा

On: April 19, 2025 3:56 PM
Ranjit Kasle Dismissed
---Advertisement---

 Ranjit Kasle | बीडमधील (Beed) निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले (Suspended Police Officer Ranjit Kasle) यांनी, माजी मंत्री धनंजय मुंडे (Former Minister Dhananjay Munde) यांच्या सांगण्यावरून वाल्मिक कराड (Walmik Karad) याचे बनावट एन्काऊंटर (Fake Encounter) करण्यासाठी आपल्याला कोट्यवधी रुपयांची ऑफर आणि त्यानंतर कायदेशीर कारवाईतून वाचवण्याचे आश्वासन देण्यात आले होते, असा खळबळजनक दावा केला आहे.

एन्काऊंटरची ऑफर

रणजीत कासले यांनी केलेल्या दाव्यानुसार, त्यांना वाल्मिक कराड याच्यावर २४ तास पाळत ठेवण्यास आणि रिव्हॉल्व्हर (Revolver) जवळ बाळगण्यास सांगण्यात आले होते. “तुम्हाला कुठे चुकीचे वाटले तर कारवाई करा (Shoot him),” अशी कथित ऑफर त्यांना देण्यात आली होती, असे कासले यांचे म्हणणे आहे.

या कामासाठी त्यांना मोठ्या रकमेचे आमिष दाखवण्यात आले. “माझी उर्वरित २५ वर्षांची नोकरी असेल आणि त्यात माझा पगार १५ कोटी होत असेल, तर तुम्हाला एकरकमी ५० कोटी रुपये मिळतील,” असे सांगण्यात आले. इतकेच नव्हे तर, “नंतर चौकशी लागली तरी आमचेच सरकार असेल आणि आम्ही तुम्हाला त्यातून निर्दोष बाहेर काढू,” असे आश्वासनही या ऑफरमध्ये समाविष्ट होते, असा दावा कासले यांनी केला आहे.

 Ranjit Kasle | पुढील कायदेशीर लढाई

वाल्मिक कराड हा मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असून, तो धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय मानला जातो. कासले यांनी यापूर्वी मुंडेंवर निवडणुकीत ईव्हीएमपासून (EVM) दूर राहण्यासाठी १० लाख रुपये दिल्याचा आरोपही केला होता. पुणे विमानतळावर (Pune Airport) उतरल्यावर कासले यांना बीड पोलिसांनी अटक केली.

कासले यांच्या आरोपांनंतर धनंजय मुंडे यांचे निवडणुकीतील प्रतिस्पर्धी राजेसाहेब देशमुख (Rajesaheb Deshmukh) यांनी या प्रकरणाची न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे. तसेच, अंजली दमानिया (Anjali Damania) यांनीही मुंडे यांच्या आमदारकीला आव्हान दिले आहे. त्यामुळे कासले यांच्या या नव्या दाव्याने मुंडे यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.

Ranjit Kasle Talk about Encounter Offer

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now