Manoj Jarange | मराठा आरक्षणावर राज्यपालांचं महत्वाचं वक्तव्य!

On: January 26, 2024 11:47 AM
Manoj Jarange
---Advertisement---

मुंबई | प्रजासत्ताक दिनानिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईतील इमारतींवर आकर्षक विद्युत रोशनाई करण्यात आली आहे. मुंबईत प्रजासत्ताक दिनाचा उत्सव सुरु असताना मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आज मुंबईत दाखल होणार आहे.

मनोज जरांगे पाटील मुंबईत दाखल

मनोज जरांगे पाटील हजारो मराठ्यांसह मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या वेशीवर धडकले आहे. जरांगेंशी चर्चा करण्यासाठी सरकार पावले उललत. तर दुसरीकडे राज्यपाल रमेश बैस यांनीही मराठा आरक्षणावर आपली भूमिका मांडली आहे.

Manoj Jarange Patil | मराठा आरक्षणावर राज्यपालांचं महत्वाचं वक्तव्य

राज्यपालांनी पहिल्यादा मराठा आरक्षणावर भाष्य केलं आहे. तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करण्याच्याही हालचाली सुरु आहे. मराठा आरक्षणाबाबत न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे, असं राज्यपाल म्हणालेत.

राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात मे 2023 मध्ये क्यूरेटिव पिटीशन दाखल केली. शासनाची बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञांचा टास्क फोर्स स्थापन करण्यात आली आहे, असंही त्यांनी सांगितलं. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलंय.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील नवी मुंबईत शुक्रवारी पहाटे चार वाजता दाखल झाले. यावेळी त्यांचा जोरदार सत्कार करण्यात आला. पनवेलमध्ये जरांगे पाटील दाखल होताच क्रेनने हार घालत आणि जेसीबीने फुलांची उधळण करत जरांगे पाटील यांचे स्वागत करण्यात आले.

वाशीमध्ये झेंडावंदन केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सूचक प्रतिक्रिया दिली. आझाद मैदानात जाणार असल्याचेच मनोज जरागें यांनी सांगितलं. सरकारच्या शिष्टमंडळाशी चर्चा अद्याप झालेली नाही. थोड्या वेळात चर्चा होईल. सरकारसोबत चर्चा झाल्यानंतर प्रसारमाध्यमाला माहिती दिली जाईल. बैठकीत तोडगा निघाला नाही तर आझाद मैदानावर जाणार आहे, असे मनोज जरांगे यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या- 

Padma awards 2024 | पद्म पुरस्कार विजेत्यांची यादी जाहीर; महाराष्ट्रातील ‘या’ मान्यवरांचा होणार सन्मान

Ram Mandir | डोळे मिचकावताना दिसले रामलला; AI ने बनवला ‘भारी’ व्हिडीओ

Bollywood Actress | अभिनेत्री Kriti Sanon ला यूएई सरकारकडून मोठी ‘भेट’

Lok Sabha Election 2024 । कंगना पक्षातून निवडणूक लढणार? भाजप उपाध्यक्षांचं सूचक विधान

Virat Kohli चा ICC कडून मोठा सन्मान; असे करणारा जगातील पहिला खेळाडू

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now