Ram Mandir | अयोध्या टेंट सिटीत फाईव्ह स्टार हॉटेलसारख्या सुविधा; व्हिडीओ तूफान व्हायरल

On: January 22, 2024 1:34 PM
Ram Mandir tent city video viral
---Advertisement---

Ram Mandir | अयोध्येमधील राम मंदिरात (Ram Mandir ) प्रभू श्रीराम आज (22 जानेवारी) विराजमान होणार आहेत. या सोहळ्यासाठी लाखो भाविक अयोध्येत दखल झाले आहेत. त्यांच्या राहण्यासाठीच एक भव्य टेंट सिटी उभारण्यात आली आहे. या टेंट सिटीत एखाद्या फाइव्ह स्टार हॉटेल सारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत.

याचा व्हिडीओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. टेंट सिटीमध्ये सर्व लग्जरी सुविधा देण्यात आल्या आहेत. व्हिडीओ बघून तुम्हालाही ते दिसून येईलच. त्यामुळे सोहळ्याची चर्चा तर आहेच आता या टेंट सिटीची देखील चर्चा होत आहे.

टेंट सिटीचा व्हिडीओ व्हायरल

पाहुण्यांसाठी अयोध्येमध्ये (Ram Mandir ) तब्बल एक हजार टेंटची उभारणी करण्यात आली आहे. टेंटच्या एंट्रीलाच सुंदर दोन खुर्च्या ठेवल्या आहेत. जशी आपल्या घरात रचना असते. काहीशी तशीच या टेंटमध्ये रचना करण्यात आली आहे. आतमध्ये पांढऱ्या रंगाचा सोफा त्याच्याजवळ टेबल आणि डबल बेड ठेवण्यात आला आहे.

यासोबतच पाणी किंवा चहा करण्यासाठी इलेक्ट्रीक किटली ठेवण्यात आली आहे. एक चेंज रूम आणि वॉशरुमची देखील सुविधा करण्यात आली आहे. यासोबतच गिझर आणि वॉश बेशिंगसोबत वॉशचे सर्व सामान ठेवण्यात आले आहे. या सर्व सुविधा बघून सध्या याचीच चर्चा होत आहे. तब्बल 20 एकर जागेवर ही सिटी उभारण्यात आली आहे. एवढ्या लोकांसाठी जेवण्याचीही उत्तम सुविधा केली आहे. सरस्वती विद्यालयच्या पटांगणामध्ये रोज दहा हजार लोकांसाठी जेवण बनवण्यात येत आहे.

आज होणार प्राणप्रतिष्ठा सोहळा

22 जानेवारी या दिवशी अनेक शुभ योग आहेत. आजच्या दिवशी अभिजीत मुहूर्त, सर्वार्थ सिद्धी योग, अमृत सिद्धी योग आणि रवि योग असे तीन शुभ योग आहेत. कोणताही शुभ कार्य करण्यासाठी हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. तसेच, अभिजीत मुहूर्त, सर्वार्थ सिद्धी योग आणि अमृत सिद्धी योग या शुभ मुहूर्तावर भगवान श्रीरामांचा जन्म झाला असल्याचे मानले जाते. म्हणूनच सोहळ्यासाठी आजचा दिवस निवडण्यात (Ram Mandir ) आल्याचे म्हटले जाते.

त्यानुसार अभिजीत मुहूर्तावर नवीन मंदिरात रात्री 12:29 ते 12:30 32 च्या दरम्यान प्रभू रामाचा अभिषेक केला जाईल. या अभिजीत मुहूर्ताच्या 84 सेकंदात धार्मिक विधी पार पाडले जातील. पंतप्रधान नरेंद्र मोदी या सोहळ्याला संबोधित करणार आहेत.

News Title- Ram Mandir tent city video viral

महत्त्वाच्या बातम्या –

Team India | जय श्री राम…! भारतीय खेळाडूचं शतक प्रभू श्री रामाला समर्पित

Mira Road Riots | सनातन यात्रेवर हल्ला! श्री रामाचे झेंडे फाडले; तणावानंतर मोठा पोलीस बंदोबस्त

Ram Mandir | प्राण प्रतिष्ठा कार्यक्रम अन् ‘दिवाळी’! बाजारात 1 लाख कोटींहून अधिकची उलाढाल

“तो आमच्या जमान्यात असता तर…”, Shoaib Akhtar ला विराटच्या क्षमतेवर शंका

Ram Mandir | स्वप्नपूर्ती! साक्षात रामलला आज घरी आले; बाळाला जन्म दिलेल्या महिलांची भावना

Join WhatsApp Group

Join Now