Ram Mandir | अयोध्येमध्ये प्रभू श्रीराम मंदिराचा भव्य उद्घाटन सोहळा होणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन येत्या 22 जानेवारीला सोहळ्यानिमित केंद्रीय कर्मचाऱ्यांना अर्धा दिवस सुट्टी जाहीर केली होती. मात्र यात महाराष्ट्र राज्याचा समावेश आहे की नाही, याबाबत संभ्रम होता. आता मिळालेल्या माहितीनुसार शिंदे सरकारने (Shinde Govt) देखील सार्वजनिक सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयानुसार सरकारी आणि खाजगी कार्यालयं, शाळा-कॉलेजला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. काल केंद्र सरकारने अधिकृत परिपत्रक जाहीर करत केंद्रीय कर्मचाऱ्यांना अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केली होती. यानंतर महाराष्ट्र शासनाने देखील सुट्टीची घोषणा केली आहे.
शिंदे सरकारचा मोठा निर्णय
कर्मचाऱ्यांच्या भावना आणि आग्रह लक्षात घेऊन सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 22 जानेवारीला (Ram Mandir) महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील कर्मचाऱ्यांना अर्धा दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सरकारने याबाबत एक परिपत्रक जारी केले आहे. त्यात सोहळ्यात सामील होण्यासाठी कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्यात येत असल्याचे म्हटले आहे. छत्तीसगड, गोवा, हरियाणा, उतर प्रदेश, ओडिशा, राज्यस्थान, आसाम, मध्यप्रदेश नंतर महाराष्ट्र राज्याने हा निर्णय घेतला आहे.
22 जानेवारी 2024 रोजी प्रभु श्री राम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री @mieknathshinde जी, उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी, आणि उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks जी यांच्या नेतृत्वाखालील महायुती… pic.twitter.com/oKu2mPhRQb
— Manoj Kotak (@manoj_kotak) January 19, 2024
सरकारच्या या निर्णयानुसार 22 जानेवारीला (Ram Mandir) देशातील केंद्रीय कार्यालये, केंद्रीय संस्था, केंद्रीय औद्योगिक संस्था अर्धा दिवस म्हणजेच दुपारी अडीच वाजेपर्यंत बंद असणार आहेत. श्री राम मंदिरात रामल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात आता कर्मचाऱ्यांना देखील सहभागी होता येणार आहे. त्यामुळे सर्वत्रच आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नागरिकांनी केले निर्णयाचे स्वागत
अयोध्येमध्ये दुपारी साडे बारा वाजता मंदिर (Ram Mandir) उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी संबोधन करणार आहेत. सोहळ्याला आठ हजार निमंत्रित उपस्थित राहणार असल्याचे म्हटले जात आहे. यासाठी आता पासूनच भव्य तयारी केली जात आहे. या दिवशी देशभरातील विविध शास्त्रीय वाद्यांचे वादन केले जाणार आहे. या कार्यक्रमासाठी भारताच्या विविध भागांतील संगीतकारांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या देशातील वातावरण धार्मिक झाले आहे.
अभिषेक सोहळ्यापूर्वी (Ram Mandir) मंगळवारपासून अयोध्येमध्ये अनेक विधी सुरू झाल्या आहेत. हे कार्यक्रम 21 जानेवारीपर्यंत चालणार आहेत. त्यामुळे देशातील वातावरण सध्या राममय झाले आहे. तसेच, शिंदे सरकारच्या या निर्णयाने राज्यातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
News Title- Ram Mandir holiday declared in Maharashtra
महत्वाच्या बातम्या-
Pune News | अदानी कंपनीचं पुणेकरांना मोठं गिफ्ट!
PM Narendra Modi | सोलापूरकरांसमोर नरेंद्र मोदींना अश्रू अनावर, म्हणाले…
Taapsee Pannu | तापसी पन्नूचा सर्वांत मोठा खुलासा; म्हणाली, “10 वर्षांपासून एकाच..”
Rohit Pawar | सर्वात मोठी बातमी! रोहित पवारांना ईडीचा झटका
Student Niamh Hearn | रोज पार्ट्या करुन करुन तरुणी होत चालली होती जाड, एके दिवशी अचानक…






