“आया बहिणींकडे वाईट नजरेने बघणारा…”, ठाकरे गटाचे उपनेते राम कदम यांच्यावर संतापले

On: April 2, 2024 10:45 PM
Ram Kadam
---Advertisement---

Ram Kadam | आगामी लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. यापार्श्वभूमीवर विरोधक सत्ताधाऱ्यांवर आणि सत्ताधारी विरोधकांवर टीका करताना दिसत आहे. भाजपचे आमदार राम कदम (Ram Kadam) हे अनेक कारणांनी चर्चेत असतात. त्यांनी केलेलं वक्तव्य आजही जनता विसरलेली नाही.

आता पुन्हा एकदा राम कदम (Ram Kadam) यांच्यावर ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी राम कदम (Ram Kadam) यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे. “राम कदम तु तमाशातील नाच्याप्रमाणे आहेस. उद्धव ठाकरेंवर बोलण्याची तुझी लायकी नाही. तुझा बरोबर बंदोबस्त केला जाईल”, अशी धमकीची भाषा शरद कोळी यांनी केली.

“आया बहिणींकडे वाईट नजरेने बघणारा…”

उद्धव ठाकरे यांच्यानंतर ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी राम कदम (Ram Kadam) यांच्यावर हल्ला केला आहे. “उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करायची तुझी लायकी आहे का? आया बहीणींना उचलून आणण्याची भाषा करणारा माणूस, प्रत्येक आया बहिणींकडे वाईट नजरेने बघणारा खट्टा मीठा चित्रपटातील अन्सारी आहेस,” अशा शब्दात शरद कोळी यांनी राम कदम यांना सुनावले आहे.

“तमाशातील नाच्याप्रमाणे आहेस”

“राम कदम तु तमाशातील नाच्याप्रमाणे आहेस. उद्धव ठाकरेंवर बोलायची तुझी लायकी नाही. मनसेतून हकलून दिल्यानंतर भाजपच्या दारात कुत्र्यासारखा भुंकत पडला आहे. राम कदम तु हिशोबात राहा अन्यथा तुझा वेगळा कार्यक्रम केला जाईल,”, असं शरद कोळी म्हणाले आहेत.

राम कदम यांचे वक्तव्य चर्चेत

काही दिवसांआधी राम कदम यांनी तरूणांनो आवडणाऱ्या पोरीला उचलून घेऊन येऊ असं वक्तव्य राम कदम यांनी केलं होतं. त्यावेळी राम कदम यांच्यावर चहू बाजूने टीकांचा वर्षाव होत होता.

काही दिवसांआधी राम कदम यांनी त्यांच्या घाटकोपर मतदारसंघामध्ये वेळेवर पाणी येत नसल्याने एक निर्धार केला होता. राम कदम यांनी जोपर्यंत घाटकोपर मतदारसंघामध्ये वेळेवर पाणी येणार नाही तोवर केस कापणार नाही असा त्यांनी निर्धार त्यांनी केला होता. त्यामुळे ते वेगळ्या कारणाने चर्चेत राहिले होते.

News Title – Ram Kadam Against Slam Uddhav Thackeray Leader Sharad Koli

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईच्या पराभवाची हॅटट्रिक! हार्दिक चाहत्यांच्या निशाण्यावर, रोहितच्या कृतीनं मन जिंकलं, Video

हार्दिकसाठी चीअर करण्याचं आवाहन; पण पांड्याची झाली फजिती, नेमकं काय घडलं?

रोहितचा फॅन थेट मैदानात शिरला; हिटमॅनलाही धक्का बसला, सर्वांची उडाली धांदल, Video

‘मुंबईचा राजा रोहित शर्मा’, वानखेडेवर क्रिकेट चाहत्यांची घोषणाबाजी

आचार्य चाणक्यांनी सांगितल्या प्रमाणे करा दिवसाची सुरुवात; होईल फायदाच फायदा

 

Join WhatsApp Group

Join Now