‘अंबानी यांच्या प्री-वेडिंग सोहळ्याला भांडी देखील घासली असती’, राखी सावंतचा व्हिडीओ व्हायरल

On: March 6, 2024 7:55 PM
Rakhi Sawant
---Advertisement---

Rakhi sawant | उद्योगपती मुकेश आंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि त्याची होणारी बायको राधिका मर्चंट यांचा शाही प्री-वेडिंग सोहळा गुजरातमधील जामनगरमध्ये पार पडला होता. यावेळी अंबानी यांनी बॉलिवूडच नाहीतर हॉलिवूडमधील अनेक कलाकारांना या प्री-वेडिंग सोहळ्याचं निमंत्रण दिलं होतं. मात्र बॉलिवूडच्या एका अभिनेत्रीला निमंत्रण न दिल्यानं ती नाराज झाली आहे. (Rakhi sawant)

बॉलिवूडमध्ये नेहमी चर्चेत असलेली अभिनेत्री राखी सावंतला (Rakhi sawant) अंबानी परिवाराने आपल्या प्री-वेडिंग सोहळ्यामध्ये निमंत्रित केलं नाही. म्हणून ती आता नाराज झाली आहे. तिनं आपला व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या विरल भयानी या इन्स्टा हॅन्डेलवर शेअर करण्यात आला.

काय म्हणाली राखी सावंत?

अंबानी यांचा प्री-वेडिंग सोहळा नुकताच पार पडला आहे. या सोहळ्यामध्ये अनेक हॉलिवूडचे कलाकार सहभागी होते. रिहाना देखील या सोहळ्यात होती. यावेळी रिहानाने नृत्य करत उपस्थितांची मने जिंकली होती, मात्र आता राखी सावत म्हणाली की रिहाना फाटलेल्या कपड्यामध्ये नाचत होती. मी हॉ कपडे घालून नृत्य केलं असतं आणि संपूर्ण स्टेज झाडला असता, असं राखी सावंत (Rakhi sawant) म्हणाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)


रिहाना, अॅकॅन माझ्यासमोर शेंगा आहेत. तुम्ही माझा डान्स पाहिलाय, परदेसिया, मुन्नी बदनाम एवढी गाणी केली तरीही तुम्ही मला का बोलावलं नाही?, असा सवाल राखी सावंतने (Rakhi sawant) केला आहे.

“भांडी घासली असती”

तुम्ही हजार कोटी रूपये खर्च करून तुम्ही राखी सावंतला बोलावलं नाही. हे तुम्ही काय केलं असा सवाल आता राखी सावंतने केला आहे. मी आल्याचे चार फायदे झाले असते. मी डान्स केला असता, सर्व पाहुण्यांच्या खोल्या साफ केल्या असत्या, भांडी घासली असती, असं राखी सावंत म्हणाली आहे.

प्री-वेडिंग सोहळ्यामध्ये पॉप डान्सर रिहानाने डान्स केला. दुसऱ्या दिवशी तीन खान हे नाटू नाटू या गाण्यावर थिरकले. तसेच रणवीर-आलिया, आकाश अंबानी आणि श्लेका हे केसरीया या गाण्यावर थिरकले आहेत.

News Title – Rakhi Sawant Nurvous About ambani not invite to her

महत्त्वाच्या बातम्या

ग्राहकांना मोठा धक्का; सोनं महागलं, जाणून घ्या दर

सकाळी उपाशी पोटी Coffee पिणं ठरू शकतं अत्यंत धोकादायक!

पुणे ड्रग्ज प्रकरणाबाबत मोठी माहिती समोर!

“शरद पवार यांना सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करायचं आहे”

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांना झटका

Join WhatsApp Group

Join Now