‘राजा तू चुकतोय’, ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल

On: December 20, 2022 8:53 PM
---Advertisement---

मुंबई| मंगळवारी विधानसभा आणि विधानपरिषदेत विरोधकांनी नागपूरमधील कथित NIT भूखंड गैरव्यवहाराच्या प्रकरणावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना(Eknath Shinde) धारेवर धरलं होतं. यावेळी विरोधकांकडून मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

या प्रकरणी उद्धव ठाकरेंनी(Uddhav Thackeray) माध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी ठाकरे म्हणाले की, हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना त्यात सरकारनं केलेला हस्तक्षेप चुकीचा आहे. आम्ही यावर आक्षेप घेतला आहे. तसेच बुधवारी यावर विधानसभेत चर्चा होईल, असंही ठाकरे म्हणाले आहेत.

ज्या पद्धतीनं सरकारचं कामकाज सुरू आहे, त्यावरून राज चुकत आहे असं दिसतं आहे. राजा तू चुकतोय हे सांगणं आमचं काम आहे कारण याचा फटका जनतेला बसत आहे, असं म्हणत ठाकरेंनी शिंदेंची कानटोचणी केली.

दरम्यान, काही आमदारांच्या निधीला कात्री लावली जात आहे, याबद्दल सरकारनं अश्वासनं दिलं आहे, असंही ठाकरे म्हणाले आहेत. आमदारांच्या निधीबद्दल विषमता खपवून घेतली जाणार नाही, असं म्हणत त्यांनी शिंदेंना थेट इशारा दिला आहे.

महत्वाच्या बातम्या-

Join WhatsApp Group

Join Now