Sonam Raghuvanshi | राजा रघुवंशी हत्या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. आता या प्रकरणात एक नव वळण आला असून, सोनम रघुवंशीचं लग्न याआधी इतर कुणासोबत ठरत होतं, असा धक्कादायक दावा धारमधील एका व्यावसायिकाने केला आहे. त्यानुसार, सोनम आणि त्याच्या मुलाच्या पत्रिका पाहून दोघांचे २५ गुण जुळले होते. परंतु, ज्योतिषांनी धोका असल्याचं सूचित केल्यामुळे लग्नाचा निर्णय मागे घेण्यात आला होता.
या नव्या दाव्यामुळे सोनमच्या (Sonam Raghuvanshi) पूर्वीच्या संबंधांवर प्रश्नचिन्ह उभे राहत असून, तिच्या वागणुकीविषयी अजून संशय बळावला आहे. सोनमने आधीच राजा रघुवंशीची हत्या प्रियकर राज कुशवाह यांच्या मदतीने केल्याची कबुली पोलिसांसमोर दिली आहे.
‘हे नातं तुमच्यासाठी घातक ठरेल’ – ज्योतिषांचा इशारा :
धारमधील व्यापाऱ्याने सांगितले की, “माझा मुलगा मयंक आणि सोनम यांचे २५ गुण जुळले होते. लग्नासाठी बोलणी झाली होती. पण आमच्या ज्योतिषांनी सांगितले की हे नातं आमच्या कुटुंबासाठी धोकादायक ठरेल. त्यामुळे आम्ही तो प्रस्ताव थांबवला.” हा निर्णय नंतर योग्य ठरल्याचंही त्यांनी नमूद केलं.
ही माहिती पुढे आल्यानंतर सोनमचा पूर्वाश्रमीचा चेहरा आणि मानसिकता काय होती, यावर संशोधन सुरू झालं आहे. सोनम आणि राज कुशवाह यांनी राजा रघुवंशीची हत्या २३ मे रोजी मेघालयमध्ये हनिमूनदरम्यान केली होती. हत्येनंतर सोनम तब्बल १४ दिवस एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये लपून राहत होती. (Sonam Raghuvanshi)
Sonam Raghuvanshi | रघुवंशी कुटुंबाची चौकशी, पोलिसांचा तपास अधिक खोलात :
मेघालय पोलिसांच्या विशेष पथकाने नुकतीच इंदूरमध्ये राजा रघुवंशीच्या कुटुंबाची चौकशी केली. राजाची आई आणि भावांकडून सोनमच्या (Sonam Raghuvanshi) वागणुकीविषयी महत्त्वपूर्ण माहिती गोळा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, सोनमने हत्या केल्यानंतरही ती घराजवळच राहत होती, हे उघड झाल्यामुळे तपास अधिक गंभीर बनला आहे.
राजाच्या मृत्यूपूर्वीच्या घटनाक्रमाची पुनर्रचना करण्यात येत असून, सोनमच्या हनिमूनपासून इंदूरमधील लपण्यापर्यंतच्या प्रत्येक हालचालींवर पोलिस बारकाईने लक्ष ठेवून आहेत. पोलिसांनी तिचा भाड्याचा फ्लॅटही झडतीस घेतला आहे आणि काही महत्त्वाचे पुरावे हाती लागल्याची शक्यता आहे.






