राज ठाकरेंच्या आंदोलनाला मोठं यश; ‘या’ 16 निर्णयांवर शिक्कामोर्तब

On: October 13, 2023 2:07 PM
---Advertisement---

मुंबई | महाराष्ट्रात गेले काही दिवस टोलनक्यावरुन वाद सुरु आहे. या मुद्द्याला धरुन मनसे (MNS) कार्यकर्त्यांनी मुलुंड-ठाणे या ठिकाणी आंनदोलन केलं. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंंनी (Raj Thackeray) देखील पत्रकार परिषद घेत टोल दरवाढ रद्द झाली पाहिजे ही मागणी केली होती. अखेर राज ठाकरे यांच्या प्रयत्नांना यश आलं आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची टोलनाक्याच्या विषयावरून त्यांच्या निवासस्थांनी महत्त्वाची बैठक पार पाडली. या बैठकीमध्ये राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांची उपस्थिती होती. दरम्यान या वेळी राज ठाकरे यांनी काही मुद्धे मांडले अखेर त्यांच्या टोल आंदोलनाला मोठं यश आलं आहे. यावेळी काही महत्त्वाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. यातील काही निर्णयांची आजपासूनच अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

कोणते आहेत महत्त्वाचे निर्णय?

टोलनाक्यावर पुरुष आणि स्त्रियासंसाठी स्वच्छ प्रसाधन गृह ठेवले जातील त्यासोबत प्रथोमपाचारासाठीची सेवा, रुग्णवाहिका, क्रेन, पोलीस अंमलदार, तक्रार वही आदी गोष्टी असतील.

प्रवाशांसाठी टोल नंबर दिला जाईल. लोकांना त्या नंबरवर मेसेज करून तक्रार देता येईल. या यंत्रणेचे नियंत्रण मंत्रालयात असेल.

टोलनाक्यावर फास्टॅग चालला नाही तर एकदाच पैसे भरावे लागतील.

कितीचं टेंडर आहे? कितीचा टोल आहे? तो आकडा दिला जाईल. रोजची वसुली किती होते? टोलचे किती पैसे जमा झाले? किती उरले? याची माहिती टोलनाक्यावरील बोर्डवर दिली जाईल. टोलनाक्याच्या दोन्ही बाजूला हे डिजिटल बोर्ड लावले जातील.

मुलुंडच्या हरिओम नगर परिसरातील लोकांसाठी पूल बांधला जाईल. म्हणजे हरिओम नगरमधील नागरिकांना टोल भरावा लागणार नाही.

इतर राज्यात गुळगुळीत रस्ते दिसतात. महाराष्ट्राने काय घोडं मारलं? महापालिका, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची एकत्र बैठक होत नाही, त्यामुळे चांगले रस्ते मिळत नाही. त्यामुळे याचा एकत्रित निर्णय करावा लागेल, असं राज ठाकरेंनी सांगितलं.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे 29 आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे 15 असे 44 जुने टोलनाके बंद करण्याचा निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी एक महिन्याचा कालावधी मागितला आहे. त्यावर ते निर्णय घेतील, असंही त्यांनी सांगितलं.

जड अवजड वाहने कोणत्याही लेनमध्ये येतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. या प्रकाराला महिन्याभराच्या आत शिस्त लावली जाईल.

टोल प्लाजा परिसरात राहणाऱ्या नागरिकांना सवलत मिळावी म्हणून पास दिले जाणार आहेत.

थोडक्यात बातम्या-

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now