जागतिक महिला दिनानिमित्त राज ठाकरेंची महिलांना मोठी ऑफर!

On: March 8, 2023 11:47 AM
---Advertisement---

मुंबई | आज जागतिक महिला दिन आहे. यानिमित्त राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत महिलांना जागतिक महिला दिनाच्या (Womens Day) शुभेच्छा दिल्या आहेत.

राज ठाकरेंनी शुभेच्छा देताना महिलांना राजकारणात येण्याचं आवाहन केलं आहे. मनसे महिलांना संधी देण्यास तयार असल्याचंही म्हटलं आहे.

आज ग्रामीण भागातील असो की शहरी भागातील, इथल्या मुलींना उच्च शिक्षणाची , स्वतःच करिअर घडवायची प्रचंड ओढ आहे. आणि त्यासाठी त्या घरापासून लांब, इतर शहरांत किंवा परदेशांत नोकरी, शिक्षणाच्या निमित्ताने सहज स्थिरावत आहेत, आणि जिथे जातील तिथे स्वतःचा ठसा उमटवत आहेत. हे चित्र आनंददायी आहे, असं राज ठाकरे म्हणालेत.

दरम्यान, जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवणं हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं ध्येय आहे, आणि हे साध्य करायचं असेल तर स्त्रियांचा सहभाग देखील तितकाच महत्वाचा आहे, ह्याची आम्हाला जाणीव आहे, असं राज ठाकरे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now