Raj Thackeray | आगामी लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. राज्याच्या राजकारणामध्ये अनेक राजकीय घटना घडताना दिसत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे महायुतीसोबत जाणार असल्याच्या चर्चा होत्या. मुंबई येथे राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा गुढीपाडवा मेळावा पार पडला त्या मेळाव्यात राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मोदींना बिनशर्त पाठिंबा देणार असल्याचं सांगितलं. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटण्यामागचं कारण सांगितलं.
मनसेनं नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला आहे. असं असलं तरीही हॉटेल ताज लँड्स येथे झालेल्या चर्चेमुळे मनसेचं गणित फिसकटलं आहे. गुढीपाडव्याला राज ठाकरे यांनी मी शिवसेनेचा प्रमुख होणार नाही. मी मनसेचा अध्यक्ष राहणार आहे. असं राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले होते.
हॉटेल ताज लँड्सच्या बैठकीने घातला घोळ
काही दिवसांआधी राज ठाकरे आणि पुत्र अमित ठाकरे हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीला गेले होते. त्यावेळी राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्यात बैठक झाली. मुंबईतील दोन जागांवर मनसे लढणार असल्याची चर्चा होती. मनसेच्या चिन्हावर उमेदवार लढण्याबाबत अमित शहा यांनी होकार दिला असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर हॉटेल ताज लँड्स येथे बैठक झाली. त्या बैठकीने सर्व घोळ घातला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
हॉटेल ताज लँड्स येथे राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाली. या चर्चेमध्ये एकनाथ शिंदे यांनी धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवण्याबाबत सांगितलं. मात्र राज ठाकरे यांनी रेल्वे इंजिन सोडून कोणत्याही चिन्हावर निवडणूक लढवणार नाही असं सांगितलं. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर स्पष्टीकरण दिलंय.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत स्पष्टीकरण देत असताना सांगितलं की, भाजपने मनसेला कमळ चिन्हावर लढण्याबाबत कोणताही प्रस्ताव दिला नसल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिलं.
चिन्हामुळे बोलणी फिसकटली
राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या चर्चेदरम्यान चिन्हावरून बोलणी फिसकटली असल्याची माहिती समोर आलीये. एकनाथ शिंदे मनसेच्या उमेदवारांनी धनुष्यबाण चिन्हावर लढावं अशा भूमिकेवर आग्रही होते.
News Title – Raj Thackeray Use Bow And Arrow Symbol Between Election Eknath Shinde Offer
महत्त्वाच्या बातम्या
“शाल घेऊन फिरल्यावर बाळासाहेब झाल्यासारखं वाटतं”
अपघाताबद्दल स्वतः नाना पटोलेंनी केला सर्वात मोठा खुलासा!
प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी आईने केलं भयंकर कृत्य; वाचून पायाखालची जमीन सरकेल
बँकेत नोकरी करण्याची सुवर्ण संधी; अर्ज करण्याची आज अंतिम मुदत
तुमच्याही चिमुकल्याला रात्री दूध पिण्याची सवय आहे तर वेळीच सावध व्हा!






