Raj Thackeray l सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. अशातच 13 मे ला चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. यापार्श्वभूमीवर महाविकास आघाडी, महायुतीसह सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी महायुतीच्या उमेदवारासाठी पुण्यात सभा घेतली. मात्र यावेळी त्यांची ही सभा चांगलीच गाजली आहे.
अजित पवारांनी कधीही जातीपातीचं राजकारण केलेलं नाही :
राज ठाकरे यांनी पुण्यातील सभेतून मौलवी आणि मशिदींमधून फतवे निघत असल्याचं सांगत फतवे काढणाऱ्यांना ठणकावलं आहे. तसेच काँग्रेस व उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर देखील हल्लाबोल करत अजित पवारांच्या राजकीय भूमिकेचं चक्क कौतुक केलं आहे. राज ठाकरेंनी भाषणाची सुरवात करतानाच पुणे शहर कुठून कुठपर्यंत पोहोचलं आहे. तसेच राज ठाकरेंनी पुणे शहराच्या विस्तारीकरण व सोयीसुविधांबद्दल खंत व्यक्त केली आहे. तर पुण्यातील सभेतून अजित पवारांच्या राजकीय कारकिर्दीचं कौतुक करत शरद पवारांना लक्ष्य केलं आहे.
या सभेदरम्यान राज ठाकरेंनी अजित पवारांचं कौतुक केलं आहे. अजित पवार या माणसाने कधीही जातीपातीचं राजकारण केलेलं नाही, माझे स्वतःचे त्यांच्याबद्दल अनेक मतभेद असतील, पण मी जेवढं त्यांना ओळखत आहे, त्यात त्यांनी कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही. तसेच शरद पवार यांच्यासोबत राहूनही त्यांनी जातीपातीच राजकारण केलं नाही. 1999 पासून संभाजी पार्कमध्ये हे जातीपातीचं विष पसरवलं गेलं आहे असे म्हणत राज ठाकरेंनी शरद पवारांना जातीपातीच्या राजकारणावरुन लक्ष्य केलं आहे.
Raj Thackeray l माझे मोदी सरकारबद्दलचे मतभेद राहणार :
राज ठाकरेंनी सभेदरम्यान जोरदार हल्लाबोल केला आहे. मशिंदीमधून हे मौलवी जर फतवे काढत असतील की ह्यांना मतदान करा, मग आज राज ठाकरे तुम्हाला फतवा काढतो. तसेच माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो… महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ असतील, शिंदेचे आणि अजित पवारांचे उमेदवार असतील त्यांना भरगोस संख्येने मतदान करा.
तसेच ही जी अनेक लोकांची चुळबूळ सुरू आहे म्हणजेच काँग्रेसला मतदान करा म्हणून त्याचे कारण, गेल्या 10 वर्षांत ह्यांना तोंडवर देखील काढता आलं नाही असे म्हणत राज ठाकरेंनी फतवा काढणाऱ्यांना चांगलंच लक्ष्य केलं. माझे मोदी सरकारबद्दलचे जे काही मतभेद आहेत ते राहणार आहेत, पण मी चांगल्या गोष्टींचे समर्थनही करणार असल्याचेही राज ठाकरे यांनी म्हटल आहे.
News Title – Raj Thackeray Pune News
महत्त्वाच्या बातम्या
शनीच्या कृपेने 24 तासांत हिऱ्यापेक्षाही चमकणार ‘या’ तीन राशींचे नशीब
‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी; धो-धो पाऊस बरसणार
ब्रिजभूषण सिंह यांना झटका; लैंगिक शोषणप्रकरणी कोर्टाचा मोठा निर्णय
वेबसीरीज पाहून केलं असं काही की संपूर्ण देश हादरला; 15 वर्षांच्या मुलाला…
अजित पवारांची दमबाजी सुरुच… “तुझा असा कंड जिरवेन की”; भरसभेत निलेश लंकेंना दिला दम






