“तो पैसा राजकीय पक्षांच्या फंडात…”, राज ठाकरेंचा खळबळजनक दावा

On: February 3, 2024 12:27 PM
---Advertisement---

Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) अनेक वर्षांपासून टोलवर होणाऱ्या भ्रष्टाचाराविरोधात लढत आहेत. त्यांनी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अनेकदा भेट घेतली. माझा टोलला विरोध नसून टोलवर होणाऱ्या लुटमारीला विरोध असल्याचं ते नाशिक येथे पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. त्यांनी याआधी पिंपरी चिंचवडहून मुंबईला येत असताना खालापूर टोलनाक्यावरील रूग्णवाहिकेला रस्ता दिला होता. आता पुन्हा ठाणे – मुलुंड टोलनाक्यावरील रस्त्यावर राज ठाकरे उतरले आहेत.

नाशिक येथे राज ठाकरे यांचा दौरा होता. ते नाशिकहून मुंबईला येत असताना ठाणे – मुलुंड टोलनाक्यावर उतरले होते. त्यांनी वाहनांची कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न केले. यामुळे टोलनाक्यावरील अनेक वाहनचालकांना वाट मोकळी झाली. राज ठाकरे अनेकदा टोलच्या रस्त्यावर उतरले आहेत. मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी हा व्हिडीओ ‘X’ ट्विटर हॅंडेलवर शेअर केला.

काय आहे पोस्ट

राज ठाकरे हे नाशिकहून मुंबईकडे येत असताना ठाणे-मुलुंड टोलनाक्यावर राज ठाकरेंनी धडक दिली आहे. यावर सोशल मीडियावर त्यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. “आज नाशिक दौरा आटोपून मनसे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे मुंबईच्या दिशेने जात असताना ठाणे टोलनाक्यावर हजारोंच्या संख्येने गाड्या रांगेत ट्रॅफीकमध्ये अडकल्या होत्या. लोकांची होत असलेली गैरसोय बघून स्वतः मा.राजसाहेब ठाकरे नेहमी प्रमाणे टोलनाक्यावर गेले, अडकलेल्या लोकांना रस्ता करुन दिला आणि ठाकरे शैलीत सज्जड दम देऊन अडकलेला ट्राफीक काही क्षणात सोडवलं..” अशी पोस्ट गजानन काळे यांनी केली आहे.

“टोलला विरोध नाही टोलवसुलीला विरोध”

नाशिकमध्ये राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी “माझा टोलला विरोध नाही टोलवसुलीला विरोध आहे. टोलवर जी रोकड जमा होते त्याला विरोध आहे. टोलवरून किती गाड्या गेल्या? किती टोल वसूल झाला? कंत्राटदाराच्या खिशात किती पैसा गेला? असे अनेक प्रश्न राज ठाकरे यांनी बोलताना उपस्थित केले आहेत. त्यानंतर त्यांनी कंत्राटदारांबाबत एक दावा केला आहे.

“टोलचा पैसा राजकीय पक्षांच्या फंडात जातो”

“टोलचा पैसा हा कंत्राटदारांच्या खिशात जातो. त्यानंतर तो पैसा राजकीय पक्षांच्या फंडामध्ये जातो.” यावेळी पत्रकारांनी कोणते पक्ष? असा सवाल केला असता ते म्हणाले की, “वेळ आल्यावर मी सांगेल”, त्यानंतर त्यांनी कंत्राटदाराबाबत खुलासा केला. “काही कंत्राटदार माझ्याकडे आले होते पण त्यांना सज्जड दम दिल्यानंतर ते पुन्हा कधी आले नाहीत”, असा दावा राज ठाकरे यांनी केला आहे.

News Title – raj-thackeray-on-thane-mulund-toll-plaza

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp Group

Join Now