…तर आता मला मोदींच्या काही गोष्टी पटत आहेत; राज ठाकरेंचं भुवया उंचवणार वक्तव्य

On: May 5, 2024 9:36 AM
Raj Thackeray
---Advertisement---

Raj Thackeray l लोकसभा निवडणुकीत राज्यात मोठे बदल झालेले पाहायला मिळाले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्याने राज्यातील राजकारणाला वेगळंच वळण आलं आहे. अशातच भाजपचे रत्नागिरी सिंधुदुर्गचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ राज ठाकरेंच्या सभेचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. तसेच यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर स्तुतीसुमने देखील उधळली आहेत.

राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर केली टीका :

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी या प्रचार सभेत मनातल्या काही गोष्टी बोलून दाखवल्या आहेत. देशात उभी फूट झाली आहे. एकतर ती मोदींच्या बाजूने झाली असेल किंवा विरोधात झाली आहे पण झाली आहे. 2019 मध्ये मी जे बोललो, ते आजच्या विरोधी पक्षांमध्ये बोलण्याची कसलीही गरज नाही. मला भूमिका पटली नाही म्हणून मी विरोधात गेलो होतो. तस यांच्यासारखं नाही. मुख्यमंत्रिपद हवं होतं म्हणून विरोध करणारे काही आहेत, पण मात्र असं माझं नव्हत.

भाजपचे अडीच वर्ष तुम्हाला मुख्यमंत्री दिलं असतं तर आज जे बोलत आहात ते बोललं असतात का? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे . तसेच काल उद्धव ठाकरे म्हणाले की, कोकणातले धंदे गुजरातला जात आहेत. वा रे वा! 2014 ते 2019 या काळात तुम्ही त्यांच्या सोबत होतात. त्यावेळी का विरोध केला नाही. कोकणात प्रकल्प आले तर स्फोट होईल म्हणणाऱ्या माहिती नाही का? अॅटोमिक रिसर्च सेंटर मुंबईत देखील आहे. यांचा खासदार नाणारला विरोध करणार आणि लोकांना भडकवणार” असे रोखठोक मत मनसे अध्यक्ष राजे ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.

Raj Thackeray l मला मोदींच्या काही गोष्टी पटत आहेत

या सभेदरम्यान राज ठाकरेंनी काही गोष्टी स्पष्टपणे बोलून दाखवल्या आहेत. मी सरळ चालणारा माणूस आहे, आणि तो ठाकरेंचा जेनेटिकली प्रॉबलेम आहे. मला एखादी गोष्ट पटली तर ती पटलीच आणि जर एखादी नाही पटली तर शेवटपर्यंत नाहीच पटणार. 2019 च्या सभेत मी मोदींचा जाहीर विरोध केला होता. कारण त्यावेळी काही गोष्टी मला पाटल्या नव्हत्या.

मात्र आता काही गोष्टी पटत आहेत. तसेच याबाबत आपण मोकळे असणे गरजे आहे. तसेच मला ज्या गोष्टी पटल्या त्याचे जाहीर कौतुक करणारा मी आहे. जेव्हापासून मला राजकारणाची समज आली किंवा उमज आली तेव्हापासून मी पाहातोय आणि वाचत आहेत की 370 कलम रद्द करा. मात्र तो कलम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रद्द केला आहे आणि तो तुम्हाला मान्य करावाच लागेल.

News Title – Raj Thackeray Kokan Speech

महत्त्वाच्या बातम्या –

विरोधक म्हणतायेत एक एक वर्षाला पंतप्रधान करायचा; यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?

नागरिकांनो घराबाहेर पडू नका; आज राज्यातील या भागात उष्णतेची लाट

आज या राशींचे भाग्य चमकणार अन् नशीब पालटणार, बक्कळ पैसा मिळणार !

“शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना खोलीबाहेर काढलं…”, व्हिडीओत नेमकं काय?

सेक्स स्कँडल प्रकरणी धक्कादायक माहिती समोर!

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now