Prajwal Revanna | जीडीएसचे नेते आणि हसनपूरचे खासदार प्रज्वल रेवन्ना (Prajwal Revanna) यांच्यावर लैंगिक शोषणाचे अनेक आरोप करण्यात आले आहेत. रेवन्ना यांच्याविरोधात दोनदा रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली. खासदाराने केलेल्या गैरकारभाराबाबत आता नवनवीन खुलासे समोर येत आहेत. रेवन्ना यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्या प्रकरणी त्यांच्या फार्महाऊसवर काम करणाऱ्याने प्रज्वल रेवन्ना विरोधात तक्रार दाखल केली. व्हायरल व्हिडीओमधील महिला ही काम करणाऱ्या मुलाची आई असल्याचा दावा मुलाने केला आहे. यामुळे आता प्रज्वल यांच्या अडचणीत वाढ हेऊ लागली आहे. त्यामागून अनेक धक्कादायक खुलासे बाहेर येऊ लागले आहेत.
सेक्स स्कँडलबाबत नवीन खुलासा
रेवन्ना यांच्या व्हायरल व्हिडीओबाबत त्यांच्याच फार्महाऊसवर काम करणाऱ्या मुलाने व्हायरल व्हिडीओत माझी आई असल्याचा धक्कादायक दावा केला. यामुळे प्रज्वल रेवन्ना (Prajwal Revanna) हे अडचणीत सापडले आहेत.
प्रज्वल (Prajwal Revanna) यांनी 44 वर्षीय माजी पंचायत सदस्या यांच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. 1 मे रोजी महिलेने सीयाडीकडे तक्रार केली. तिला आणि तिच्या पतीला गोळ्या घालेल अशी धमकी देऊन रेवन्नाने तिच्यावर बलात्कार केल्याचा गंभीर आरोप केला आहे.
होलेनारिसपुरा टाउन पोलिसांनी प्रज्वल रेवन्ना आणि त्याचे वडील एचडी रेवन्ना यांच्याविरोधात त्यांच्या घरात काम करत असलेल्या कर्मचाऱ्याने तक्रार केली. तक्रारीच्या आधारे लैंगिक छळ, पाठलाग आणि गुन्हेगारी धमकीच्या आऱोपाखाली एफआऱआय दाखल केली.
महिला नेत्याने पोलिसांना सांगितले की, 2021 मध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहांच्या जागांबाबत मी प्रज्वल रेवन्ना यांच्या खासदार निवासस्थानी गेली होती. रेवन्नाने तिला एका खोलीत बोलावलं. रेवन्ना यांनी दार बंद केलं. दार बंद करण्याबाबत महिलेचा आक्षेप होता. तिला थांबण्यास सांगितलं. तिने असं न केल्यास तिला आणि पतीस गोळ्या घालण्यात येतील, अशी धमकी प्रज्वल रेवन्नाने दिलीये.
“…त्यानंतर माझ्यावर बलात्कार केला”
पतीला जर राजकीयदृष्ट्या पुढे जायचे असेल तर तिने सर्व ऐकलं पाहिजे. मात्र तिने नकार दिला. नकार देताच तो म्हणाला की माझ्याकडे बंदुक आहे तो मला आणि पतीला सोडणार नाही अशी धमकी दिली आणि त्यानंतर माझ्यावर बलात्कार केला, असा धक्कादायक आरोप पीडित महिलेनं केला.
News Title – Prajwal Revanna Sex Scandal News Update
महत्त्वाच्या बातम्या
“दादा तुमच्यात धाडस असेल तर..”, रोहित पवारांचं अजित पवारांना थेट आव्हान
उन्हाळ्यात लहान बाळांना घामोळ्याचा त्रास होतोय?; ‘हे’ उपाय करून बघा
“मोदींनी फोन लावला आणि युक्रेनचं युद्ध थांबलं, हे येड्या गबाळ्याचं काम नाही”
सूरत, इंदौरनंतर ‘या’ मतदारसंघात चक्र फिरली!
“कोल्हापूरमध्ये मर्दांची कमी आहे काय?, कशाला हवं टेस्ट ट्यूब बेबी?”






