पुणे | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आज पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी एका कार्यक्रमाला उपस्थिती लावली. कार्यक्रमात बोलत असताना पुण्याची (Pune) वाट लागली आहे, असं ते राज ठाकरे म्हणाले. येणाऱ्या निवडणुकीसाठी मनसेचे कार्यक्रते देखील कंबर कसून कामाला लागले आहेत.
काय म्हणाले राज ठाकरे?
राज ठाकरेंनी आर्किटेक्ट, इंजीनिअर आणि राज्यकर्त्यांची सौंदर्य दृष्टी यावरून राज्यकर्त्यांवर जोरदार टीका केली. आजच्या राज्यकर्त्यांकडे सौंदर्यदृष्टीच नाहीये असं ते म्हणाले. त्यामुळे आपल्याकडे शहराचं व्यवस्थित प्लानिंग होत नाही याशिवाय महापालिकांमध्ये आर्किटेक्चरपेक्षा इंजिनीअरला अधिक महत्त्व आहे.
राज ठाकरे यांनी पुणेकरांना शब्द सुद्धा दिला. माझ्या हातात उद्या सत्ता आली तर महाराष्ट्राचं प्लॅनिंग करण्याची जबाबदारी माझी. मी आर्किटेक्चरकडे देईन. माझा शब्द हा शब्द असतो. मी उद्या इंजीनिअरच्या कार्यक्रमाला गेलो तरी तुमचंच नाव घेईल, असं राज ठाकरे म्हणाले.
दरम्यान, आपल्याकडे प्रदूषण बेसुमार वाढलं आहे. हाजी अलीला समुद्र राहिला नाही. काल परवा बातमी वाचली, मुंबईत सर्वाधिक प्रदूषण आहे. मी पुण्यात अनेकदा सांगितलंय. मुंबईची वाट लागायला एक काळ लोटला. पुण्याची वाट लागायला वेळ लागणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.
थोडक्यात बातम्या






