‘मला फक्त दिल्लीत…’; राज ठाकरेंची सूचक प्रतिक्रिया

On: March 19, 2024 3:35 PM
Raj Thackeray
---Advertisement---

Raj Thackeray | आगामी लोकसभा निवडणुकांमुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यामुळे देशासह राज्यात देखील आचार संहिता लागू झाल्या आहेत. महाराष्ट्रात सध्या सर्वच पक्षांमध्ये जागावाटपाचा तिढा निर्माण झाला आहे.

अशातच महायुतीच्या गोट्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे थेट दिल्लीला पोहोचले आहेत. त्यामुळे लवकरच मनसेही महायुतीमध्ये सामील होणार, अशा जोरदार चर्चा रंगत आहेत. आता महायुतीमध्ये अगोदरच शिंदे गट, अजित पवार गट आणि भाजपा आहे. त्यात अजून एक पक्ष सामील झाला तर यांच्यात जागावाटपवरून चांगलाच वाद होण्याची शक्यता आहे.

राज ठाकरे दिल्ली दौऱ्यावर

दरम्यान, राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दिल्लीमध्ये पोहोचताच पहिली प्रतिक्रिया दिली आहे. दिल्लीमध्ये ते अमित शाह यांच्याशी चर्चा करतील, असं म्हटलं जातंय. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक सुरु आहे. या बैठकीत राज ठाकरे हे एका विशेष चार्टर्ड विमानाने दिल्लीला गेले असून येथे ते महायुती संदर्भात चर्चा करण्याची शक्यता आहे.

राज ठाकरे यांनी दिल्लीत गेल्यावर सूचक वक्तव्य केलं आहे. “आत्ता माझ्याकडे बोलण्यासारखं काही नाही. मला काहीही माहीत नाही. मला फक्त दिल्लीत या असं सांगितलं त्यामुळे मी आलोय.”, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली आहे. त्यामुळे राजकारणात सध्या राज ठाकरेंच्या दिल्ली वारीची चर्चा आहे.

राज ठाकरे महायुतीत सामील होणार?

राज ठाकरे (Raj Thackeray) अचानक दिल्लीत गेल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. 2019 मध्ये राज ठाकरे यांनी कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसला पाठिंबा दिला होता. तेव्हा सभांमधला त्यांचा लाव रे तो व्हिडीओचा डायलॉग आणि त्यांच्या सभा दोन्ही गाजल्या होत्या.

आता महाराष्ट्रात शिंदे आणि भाजपाचे सरकार आल्यापासून राज ठाकरेंची महायुतीशी जवळीक वाढली आहे. त्यामुळे राज ठाकरे लवकरच महायुतीमध्ये सामील होणार, असं म्हटलं जातंय. त्यांचा दिल्लीचा दौरा हा त्याचाच एक भाग असल्याची चर्चा आहे. आता या दौऱ्यातून पुढे काय होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

News Title- Raj Thackeray First Reaction After He Came In Delhi 

महत्त्वाच्या बातम्या –

“मी कधीच सोनिया गांधींसमोर रडलो नाही, राहुल गांधींचं…”, अशोक चव्हाणांचे प्रत्युत्तर

PSL Final: इस्लामाबाद चॅम्पियन! IPL, WPL च्या तुलनेत पाकिस्तान सुपर लीगमध्ये बक्षिसांचा दुष्काळ

महाविकास आघाडीत ठाकरे गटाला ‘इतक्या’ जागा मिळणार?

‘आमचा निर्णय झालाय’; काँग्रेसचा ठाकरे गटाला इशारा

“भावाच्या विरोधात सख्ख्या भावाला उभं करणं हा एक अत्यंत…”

Join WhatsApp Group

Join Now