महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड!; एकनाथ शिंदे, राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकत्र

On: March 21, 2024 2:42 PM
Raj Thackeray
---Advertisement---

Raj Thackeray | आगामी लोकसभा निवडणूक आता तोंडावर आली आहे. महायुतीमध्ये तीन पक्ष आहेत. यामध्ये आणखी एका पक्षाचा समावेश होणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दिल्ली दौरा केला असून केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली. त्यानंतर हॉटेल ताज लँड एंडच्या 19 व्या मजल्यावर राजकीय खलबतं असल्याच्या चर्चा आहेत. (Raj Thackeray)

हॉटेल ताज लँड एंडवर राजकीय खलबतं

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यामध्ये हॉटेल ताज लँड एंडच्या 19 व्या मजल्यावर चर्चा सुरू आहे. यावेळी ते एकत्र आले आहेत. यांच्यामध्ये जागावाटपावरून चर्चा सुरू आहे. मनसेला किती जागा देण्यात येणार याबाबत चर्चा आहे.

याआधी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्ष फोडून फारसा फरक पडला नाही म्हणून आता मनसेला महायुतीनं जवळ केलं आहे. आता त्यांना नेमक्या कोणत्या जागा देणार? तसेच महायुतीमध्ये आपल्यासोबत घेत त्यांची कशा पद्धतीने जुळवाजुळव करणार? महायुतीमध्ये मनसे आल्यास मनसेला कोणती जागा दिली जाईल. याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं आहे.

मनसेचा दोन जागांवर दावा

मनसेनं दोन जागांवर दावा केला आहे. नाशिक किंवा शिर्डी आणि दक्षिण मुंबई अशा दोन जागांवर मनसेनं दावा केला आहे. याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. महायुती या दोन जागांपैकी एक तरी जागा देईल का? हे पाहणं गरजेचं आहे. जर मनसेला यापैकी एक तरी जागा दिली तर बाळा नांदगावकर यांना उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा आहे.

भाजपला राज्यामध्ये 20 जागा मिळाल्या आहेत. एकूण 28 जागांमधून उरलेल्या जागा अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या पारड्यामध्ये जाणार आहेत. त्यातून शिल्लक दोन जागा या मनसेला दिल्या जातील अशी चर्चा आहे. भाजपची मुंबईसाठी जागा नव्हती आता ती जागा मनसेला देतील का? असा प्रश्न आहे.

मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे आणि औरंगाबाद येथे मनसेची ताकद असल्याचं बोललं जात आहे. यामुळे मनसेला यापैकी दोन ठिकाणी जागा दिल्या जाऊ शकतात, अशी चर्चा आहे.

News Title – Raj Thackeray, Eknath Shinde And Fadanvis Meeting At taj Lands Hotel

महत्त्वाच्या बातम्या

‘शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतील’; पवार कुटुंबातील व्यक्तीच्या वक्तव्याने खळबळ

“मोदींच्या गॅरंटीवर देश पुढे नेण्यासाठी राज ठाकरे..”, भाजपच्या बड्या नेत्याचं सूचक वक्तव्य

‘हे दुःख मी एकटी सहन करू शकत नाही’, अभिनेत्री कंगनाला बसला मोठा धक्का

महाराष्ट्र हादरला! 6 वर्षांच्या लेकीला बापानेच संपवलं नंतर…

सरकारी नोकरीची संधी! या विभागात भरती प्रक्रिया सुरु

Join WhatsApp Group

Join Now