“तीन इंजिनं लागूनही राज्याचं आरोग्य व्हेंटिलेटरवर असेल तर काय उपयोग?”

On: October 3, 2023 12:03 PM
---Advertisement---

बातम्या मिळवा आता थेट तुमच्या WhatsAppवर, पुढील लिंकवर क्लिक करुन आजच जॅाईन व्हा-

मुंबई | नांदेड (Nanded) पाठोपाठ छत्रपती संभाजीनगरमधून धक्कादायक बातमी आहे. शासकीय रुग्णालयाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. सोमवारी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात 24 तासात तब्बल 24 रुग्णांचा मृत्यू झाला. यात यात 12 नवजात बालकं होती. आता छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातही अशीच घटना घडली आहे.

रुग्णालयात गेल्या 24 तासात तब्बल 24 जणांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली. यामुळे राज्य शासनावर टीका करण्यात येत आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीही या मुद्यावरून सरकारला धारेवर धरत टीकास्त्र सोडलं आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.

तीन तीन इंजिनं लागून पण राज्याचं आरोग्य जर व्हेंटिलेटरवर असल्यासारखी परिस्थिती असेल तर उपयोग काय? सरकारच्या तिन्ही पक्षांनी स्वतःचा पुरेसा विमा उतरवल्यामुळे त्यांना कसलीच काळजी नाहीये पण महाराष्ट्राचं काय ? असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला आहे.

सरकारमधले तीन पक्ष ठणठणीत आहेत, ते सोडून बाकी महाराष्ट्र आजारी आहे अशी परिस्थिती आहे, हे दुर्दैव आहे. सरकारने स्वतःच आयुर्मान वाढवण्यासाठीची धडपड कमी करून महाराष्ट्राचं आरोग्य कसं सुधारेल ह्याकडे अधिक लक्ष द्यावं, असा सल्लाही राज ठाकरे यांनी सरकारला दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now