‘मला ग्रेट भेटीचा साक्षीदार होता आलं’; अमित ठाकरेंची पोस्ट चर्चेत

On: March 19, 2024 8:43 PM
Amit Thackeray
---Advertisement---

Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे काल दिल्लीला रवाना झाले. आज त्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक झाली. यावेळी राज ठाकरे आणि अमित शहा यांच्या बैठकीमध्ये युतीबाबत चर्चा झाली आहे. यावेळी राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासोबत अमित ठाकरे देखील उपस्थित होते. अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर अमित ठाकरे यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्याची सर्वत्र चर्चा आहे.

अमित ठाकरे यांची पोस्ट

अमित ठाकरे यांनी अमित शहा यांच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. “महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे (Raj Thackeray) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. मलाही या ग्रेट भेटीचा साक्षीदार होता आलं”, असं अमित ठाकरे यांनी म्हटलंय.


याचसोबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी देखील अमित शहा यांच्यासोबतचे फोटो ट्वीटरवर ट्वीट केले आहेत. आज केंद्रीय गृहमंत्री श्री. अमित शाह ह्यांच्याशी दिल्लीत भेट झाली, असं कॅप्शन फोटोला दिलं होतं.

मनसेला उभारी

मनसेनं जर भाजपशी युती केली तर मनसे थेट सत्तेत येईल. यामुळे अनेक वर्षे पिछाडीवर असणारा पक्ष आता सत्तेत जाण्याची चिन्हे आहेत. यामुळे मनसे पक्षाला उभारी मिळेल. कार्यकर्त्याला उभारी मिळू शकते. तसेच यासाठी भाजप दक्षिण मुंबईची जागा मनसेला देण्यासाठी तयार असल्याची माहिती समोर आली आहे.

मनसेची ज्या मतदारसंघामध्ये अधिक ताकद आहे ती जागा मनसेसाठी सोडावी. विधानसभेमध्ये मनसेची ज्या मतदारसंघामध्ये जी जागा आहे. त्या जागा महायुती सोडू शकतात. यामुळे राज ठाकरे यांचा पक्ष अधिक बळकट होईल. याचा भाजपला देखील तितकाच फायदा होऊ शकतो.

राज ठाकरे जर भाजपसोबत गेले तर लोकसभेहून त्यांना विधानसभेमध्ये अधिक फायदा होईल. मनसे पक्ष विधानसभेमध्ये अधिक आमदार जिंकून आणू शकेल, अशी चर्चा आहे.

News Title – Raj Thackeray And Amit Thackeray Meet Amit Shah

महत्त्वाच्या बातम्या

‘घरफोड्या देवेंद्र फडणवीसांना जेलमध्ये टाकलं पाहिजे’; ठाकरे कडाडले

ऐश्वर्या रायने ‘त्या’ खास व्यक्तीसाठी केली भावूक पोस्ट…!

“मुस्लिमांना 4 बायका ठेवण्याचा हक्क असल्याने हिंदू जळतात”

रोहित पवारांचा राज ठाकरेंना सल्ला, म्हणाले…

‘मला फक्त दिल्लीत…’; राज ठाकरेंची सूचक प्रतिक्रिया

Join WhatsApp Group

Join Now