Rain Update | ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता!

On: November 8, 2023 10:58 AM
---Advertisement---

मुंबई | राज्यामध्ये सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये विजांसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली (Weather Update) आहे. त्याचबरोबर तमिळनाडू, केरळ, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.

अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याचबरोबर वेस्टन डिस्टर्बन्स सक्रिय असल्यामुळे राज्यात पुढील 48 तास पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने (Weather Update) दिला आहे.

हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये दोन दिवस अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त केली होती. त्यानुसार राज्यातील पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. भात आणि द्राक्षाला या अवकाळीचा फटका बसणार आहे.

अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. पलूस तालुक्यात अंकलखोप या गावी रात्री वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस पडला. अचानक आलेल्या पावसाने शेतकरी हवालदिल झाला आहे.

महत्तावाच्या बातम्या- 

सेलिब्रेंटींसोबत दिसणारा Orry आहे खूप श्रीमंत; संपत्तीचा आकडा वाचून थक्क व्हाल

‘लग्न झाल्यावर माणूस रोज रोज करतो’; मुख्यमंत्र्याचं धक्कादायक वक्तव्य 

मुंबई हायकोर्टात मोठी मागणी, हा आरक्षण देणारा अध्यादेश रद्द करा! 

मराठा आरक्षणासाठी कंबर कसली… शिक्षकांना दिला मोठा आदेश! 

Naukari 2023 | मुंबई महापालिकेत मेगा भरती, 96 हजारापर्यंत पगार

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now