Raigad News | उतेखोल-माणगाव (Utekhol-Mangaon) येथे महादेव कोळी, डोंगर कोळी जिल्हा रायगड (Raigad) आदिवासी समाज सभागृहाचे उद्घाटन उत्साहात पार पडले. नव्या सभागृहामुळे आदिवासी बांधवांना सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आधुनिक आणि सुबक मंच उपलब्ध झाला आहे. आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी आणि सांस्कृतिक परंपरेच्या जतनासाठी हे सभागृह मोठी भूमिका बजावणार आहे.
आदिवासी महिलांकडून नृत्याद्वारे स्वागत-
सभागृहाच्या उद्घाटनप्रसंगी आदिवासी महिला पारंपरिक (Raigad News) वेशभूषेत सादर केलेल्या नृत्याने पाहुण्यांचे स्वागत करताना दिसल्या. त्यांच्या सांस्कृतिक सादरीकरणाने कार्यक्रमाला विशेष आकर्षण प्राप्त झाले. याच कार्यक्रमात एका भगिनीने स्वतः रेखाटलेले सुंदर चित्र भेट म्हणून सादर केले, ज्यामुळे वातावरण अधिक भावनिक झाले. यासाठी सर्व आदिवासी बांधवांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरेंची उपस्थिती-
या कार्यक्रमात महिला (Raigad News) व बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्यासह सुभाष केकाणे, शदाब गैबी, आनंद यादव, नितीन वाढवल, सुमित काळे, बंड्या उभारे, संदेश मलोरे, योगिता चव्हाण यांच्यासह अनेक समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सर्व उपस्थितांचे आदिवासी समाजाने मनापासून स्वागत केले.
उतेखोल-माणगाव (Utekhol-Mangaon) परिसरातील आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी उभारलेले हे सभागृह भविष्यातील सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे मुख्य केंद्र बनणार आहे. या सोयीमुळे आदिवासी बांधवांमध्ये नवचैतन्य निर्माण होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.






