प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी आईने केलं भयंकर कृत्य; वाचून पायाखालची जमीन सरकेल

On: April 10, 2024 4:05 PM
Crime News
---Advertisement---

Raigad Crime | रायगड (Raigad Crime) येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. आईचं स्थान हे देवापाशी असतं. माय, माऊली, जननी म्हणजे आई. मात्र आता रायगड (Raigad Crime) येथे एका आईने आपल्या पोटच्या पोरांचा जीव घेतला आहे. त्याचं कारण ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल.

आईला आपल्या प्रियकरासोबत पळून जायचं होतं. मात्र तीची लहान मुलं तिच्या प्रेमात अडचण ठरत होती. म्हणून आईने आपल्या जन्माला आलेल्या मुलाला टॉवेलनं तोंड दाबून मारलं असल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

मुलांचं वय हे 3 आणि 5 वर्षे होतं. या प्रकरणाच्या तपासातून अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली. पोलिसांनी 25 वर्षे महिलेला अटक केली आहे. महिलेचे विवाहाआधीच संबंध होते. (Raigad Crime)

नेमकं काय घडलं?

31 मार्चला वडील आठवडे बाजारात आपल्या मुलांना चप्पल आणि मिठाई आणायला गेले. त्यावेळी ते आठवडे बाजारातून घरी येताच वडिलांनी मुलांबद्दल विचारणा केली असता शीतलने सांगितलं की, मुलं संध्याकाळी 6 वाजल्यापासून घरात झोपली आहेत.

पोलिसांनी सांगितलं की, पती घरातून बाहेर पडल्यानंतर कोणीही घरात आलं नव्हतं आणि मुलंही बाहेर गेली नव्हती. मग दोन्ही मुलांचा मृत्यू कसा झाला? यामुळे संशय बळावला, म्हणून आम्ही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी जेजे रुग्णालयात पाठवले.

शीतलचे कॉल डिटेल रेकॉर्ड तपासत असताना पोलिसांना यवतमाळ येथील रहिवासी असलेल्या साईनाथ जाधव याची माहिती मिळाली. पोलिसांनी वारंवार चौकशी केली असता शीतलने गुन्ह्याची कबूली दिली. तिने तिच्या दोन्ही मुलांची हत्या केल्याचं पोलिसांसमोर कबूल केलं.

News Title- Raigad Crime Mother Killed Her Two Children

महत्त्वाच्या बातम्या

ट्रकची भीषण धडक, गाडीचा चुराडा… नाना पटोलेंसोबत नेमकं काय काय घडलं?

नाना पटोले यांच्या गाडीला भीषण अपघात, तब्येतीबद्दल महत्त्वाची माहिती समोर

…अवघ्या 2 धावांनी सनरायझर्स हैदराबादचा विजय

पंजाबच्या पराभवामुळे पॉइंट टेबलमध्ये मोठा बदल झाला; हे आहेत टॉप 4 संघ

राजस्थान रॉयल्सचा विजयरथ गुजरातवाले रोखणार का? आज होणार RR vs GT सामना

Join WhatsApp Group

Join Now