“पंतप्रधान नरेंद्र मोदी घाबरले आहेत, ते कधीही स्टेजवर रडू शकतात”

On: April 27, 2024 12:37 PM
Lok Sabha Election 2024
---Advertisement---

Rahul Gandhi | देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. कालच 26 एप्रिलरोजी लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडलं. यात देशाचं लक्ष लागून असलेल्या वायनाड लोकसभा मतदारसंघाचाही समावेश होता. राहुल गांधी येथून उभे राहिले आहेत. इंडिया आघाडीतील कॉँग्रेस हा महत्वाचा घटक पक्ष असल्याने कॉँग्रेस नेते राहुल गांधी हे स्टार प्रचारक आहेत.

त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीसोबतच इंडिया आघाडीच्या नेत्यांसाठीदेखील राहुल गांधी प्रचार घेत आहेत. काही दिवसांपूर्वीच ते महाराष्ट्रात येऊन गेले. तर, काल झालेल्या एका सभेत राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत जोरदार टीका केली. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी घाबरले असून, ते स्टेजवर रडूही शकतात,’ अशा शब्दांत राहुल गांधी यांनी मोदींना टार्गेट केलंय.कर्नाटकातील विजयपुरा येथील प्रचारसभेत ते बोलत होते.

काय म्हणाले राहुल गांधी?

‘देशाचे पंतप्रधान वेगवेगळ्या माध्यमांतून लोकांचे लक्ष वळवत आहेत. काही वेळा मोदी चीन आणि पाकिस्तानबद्दल बोलतात. तर कधी ते तुम्हाला थाळ्या वाजवायला लावतात. कधी तुम्हाला मोबाइलची टॉर्च लाइट लावायला सांगतात. यातून एकच गोष्ट दिसते, ती म्हणजे मोदी आता खूप घाबरलेले आहेत.’, अशी टीका राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केली आहे.

पुढे ते म्हणाले की, गरिबी व बेरोजगारी आणि महागाईसह भारतात सुमारे तीन ते चार कोटी समस्या आहेत. केवळ काँग्रेस पक्षच बेरोजगारी हटवू शकतो आणि महागाई कमी करून लोकांना त्यांचा हक्क देऊ शकतो. मी तुम्हाला सोपी गोष्ट एका वाक्यात सांगतो. जी संपत्ती मोदी अब्जाधीशांना देत आहेत, तोच पैसा आम्ही देशातील गरीब लोकांना देणार आहोत. असं आश्वासन यावेळी राहुल गांधी यांनी मतदारांना दिलं.

‘अग्नीवीर’ बाबत राहुल गांधींची मोठी घोषणा

यावेळी त्यांनी मोदींवर अनेक गंभीर आरोप केले. ‘गरिबांचा पैसा घेऊन मोदींनी काही लोकांना श्रीमंत केलं आहे. देशात 22 लोकांकडे सुमारे देशातील 70 कोटी लोकांकडे असलेल्या संपत्तीइतकी संपत्ती आहे. तसंच सरकारी योजनांमध्ये दलित, ओबीसी, आदिवासी, अल्पसंख्यक आणि सर्वसाधारण वर्गातील गरिबांना स्थानच नाही.’, असा आरोप यावेळी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केला.

राहुल गांधी यांनी अग्नीवीर योजनेबाबत मोठी घोषणा केली.तरुणांना चार वर्षे लष्करी सेवेत घेणारी अग्नीवीर योजना लष्कर आणि जवानांचा अपमान आहे. भारतातील तरुणांकडून मोदी यांनी लष्करातील नोकऱ्या हिसकावून घेतल्या आहेत. आम्ही अग्नीवीर योजना रद्द करू, अशी घोषणाच राहुल गांधी यांनी केली आहे.

News Title : Rahul Gandhi criticizes PM Narendra Modi

महत्त्वाच्या बातम्या-

“मी पदर पसरते, मला शेवटची…”, रडवेली होऊन पंकजा मुंडे यांची बीडकरांना कळकळीची विनंती

‘मुस्लिम मत हवं, मग मुस्लिम उमेदवार का नाही?’, बड्या नेत्याची कॉँग्रेसवर जाहीर नाराजी

पंजाबच्या तडाखेबाज खेळीपुढे शाहरुखची बोलती बंद; टी20 क्रिकेटमधील सारेच रेकॉर्ड्स झाले चकनाचूर

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधील प्रसिद्ध अभिनेता 4 दिवसांपासून बेपत्ता; शेवटच्या पोस्टमुळे खळबळ

मोठी बातमी! राज्यात स्वाइन फ्लूचा शिरकाव; ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

Join WhatsApp Group

Join Now