आलिया-रणबीरचं चाहत्यांना मोठं सरप्राईज, लेक Raha ची झलक दाखवली, पाहा व्हिडीओ

On: December 25, 2023 2:58 PM
Raha
---Advertisement---

मुंबई | अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांनी ख्रिसमसच्या खास मुहूर्तावर त्यांच्या चाहत्यांना एक खास भेट दिली आहे. या जोडप्याने त्यांची लाडकी मुलगी Raha चा चेहरा दाखवला आहे.

आलिया-रणबीरचं चाहत्यांना मोठं सरप्राईज

आज कपूर कुटुंबाच्या ख्रिसमस लंचमध्ये या जोडप्याने राहाचा चेहरा पहिल्यांदाच पापाराझींना दाखवला. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे.

रणबीर आणि आलियाने आज पहिल्यांदाच राहाला मीडियासमोर आणलं आहे. व्हिडीओमध्ये रणबीर आणि आलिया राहाला जवळ घेतात. तसेच तिला पापाराझींना भेटायला घेऊन येतात हे व्हिडीओमध्ये दिसत आहे.

Raha ची पहिली झलक समोर

राहा रणबीरच्या कडेवर शांत बसलेली दिसली. त्याचवेळी 1 वर्षाच्या राहाचे निळे डोळे, निरागस चेहरा आणि प्रेमळ हास्य यावर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत. रणबीर-आलियाची मुलगी खूप क्यूट आहे, अशी प्रतिक्रिया त्या देताना दिसत आहेत.

या व्हिडीओवर भरपूर कमेंट्स येत आहेत.राहावर सगळेच प्रेमाचा वर्षाव करत आहेत. हा व्हिडीओ समोर येताच चाहत्यांमध्ये नव्या वादाला सुरुवात झाली आहे.

अनेकांनी राहा तिच्या आईसारखी दिसत असल्याचं सांगितलं तर अनेकांनी रणबीर कपूरचं नाव घेतलं. पण बहुतेक लोकांनी राहाला ऋषी कपूरची सावली म्हटलंय. अनेक सोशल मीडिया युजर्सनी कमेंटमध्ये लिहिलं की राहा तिच्या आजोबांवर गेली आहे.

Raha First Public Appearence

View this post on Instagram

 

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

महत्त्वाच्या बातम्या- 

Weather Update | ‘या’ जिल्ह्यात थंडी वाढणार, हवामान विभागाचा महत्त्वाचा इशारा

Lok Sabha Election | महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का!, समोर आला आतापर्यंतचा सर्वात धक्कादायक सर्व्हे!

Corona Virus | काळजी घ्या! पुणेकरांसाठी अत्यंत चिंताजनक बातमी समोर

INDvSA Test Series | राहुल द्रविडने दिले संकेत, आफ्रिकेवरुद्ध असा असेल भारतीय संघ?

Apoorva Shukla | मनोरंजनसृष्टीतून धक्कादायक बातमी समोर; 35 व्या वर्षी अभिनेत्याचा मृत्यू

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now