‘ही तर राहाची जुळी बहीणच दिसतेय’, ‘तो’ फोटो पाहून चाहतेही चकित

On: March 25, 2024 4:50 PM
Raha Kapoor and Atif Aslam daughter photo goes viral
---Advertisement---

Raha Kapoor | अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांची लाडकी लेक राहा कपूरबाबत नेहमीच सोशल मिडियावर चर्चा असते. राहाचा एक फोटो जरी समोर आला की, लगेच त्यावर कमेन्टचा वर्षाव केला जातो. राहा ही आपले पंजोबा राज कपूर यांच्या सारखीच दिसते, असं चाहते म्हणतात.

पहिल्यांदा जेव्हा राहा मिडियासमोर आली तेव्हा तिच्या सुंदर आणि आकर्षक डोळ्यांची खूपच तारीफ झाली. राहाचा आणि राज कपूर यांचा फोटो तेव्हा ट्रेंडमध्ये होता. तिच्या डोळ्यांनी सर्वांनाच घायाळ केलं होतं. आता राहा कपूर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

अतिफ अस्लमच्या मुलीचा फोटो व्हायरल

प्रसिद्ध पाकिस्तानी गायक अतिफ अस्लमने सोशल मिडियावर त्याच्या लेकीचा फोटो शेअर केला होता. हा फोटो पाहून नेटकऱ्यांनी केलेल्या कमेंटने सर्वांचंच लक्ष वेधलं आहे. कारण, तिचे फोटो पाहून नेटकरी आता राहा (Raha Kapoor) आणि अतिफच्या मुलीबाबत बोलत आहेत. अतिफच्या मुलीचा फोटो पाहून सर्वांना ती राहा की दुसरी कोण असा प्रश्न पडला आहे.

अतिफ अस्लमने लेकीच्या वाढदिवशी सोशल मिडियावर फोटो शेअर केला होता.पहिल्या फोटोमध्ये अतिफ मुलीसोबत खेळताना दिसला. तर दुसऱ्या फोटोमध्ये त्याच्या मुलीचा क्यूट अंदाज दिसून आला. हे फोटो शेअर करत अतिफने मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्याच्या लाडक्या लेकीचं नाव हलिमा आहे.

राहा आणि हलिमा यांचे फोटो व्हायरल

सध्या सोशल मिडियावर तिचे फोटो तूफान व्हायरल होत आहेत. अतिफच्या या पोस्टवर प्रचंड प्रतिक्रिया उमटत आहेत. एका यूजरने ‘अगदी सेम सेम दिसतात. फक्त आई आणि वडील वेगळे आहे’ अशी कमेंट केली आहे.

तर दुसऱ्या एका यूजरने ‘अरे ही तर राहासारखी (Raha Kapoor) दिसते’असं म्हटलं आहे. तर तिसऱ्या एका यूजरने ‘बापरे दोघी जुळ्या बहिणी असल्यासारखंच वाटतंय’, अशी कमेंट केली आहे. त्यामुळे सध्या आलिया आणि रणबीर यांची लेक राहा कपूर आणि अतिफची मुलगी हलिमा यांचीच चर्चा होऊ लागली आहे.

News Title :  Raha Kapoor and Atif Aslam daughter photo goes viral

महत्त्वाच्या बातम्या-

महत्वाची बातमी! एप्रिलमध्ये ‘इतक्या’ दिवस बँका राहणार बंद

नरेंद्र मोदी स्टेडियमवर प्रेक्षकांनी हार्दिक पांड्याची काढली इज्जत, पाहा Video

भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या पत्नीची महागडी गाडी गेली चोरीला

भर मैदानात हे काय घडलं, रोहित आणि बुमराह थेट हार्दिक पांड्याला का भिडले?

लाईव्ह सामन्यात झाला खेळ, हार्दिक पांड्यासमोर कुत्र्याची एन्ट्री! पाहा Video

Join WhatsApp Group

Join Now